मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. शाहरुख या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तसंच शाहरुख चित्रपटांतून मोठी कमाई करतोच. पण शाहरुखची मॅनेजर किती कमाई करते याबाबत तुम्हाला माहितीये का? बहुतेक लोकांना माहिती नसेल पण शाहरुखची मॅनेजरची सॅलरी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
काही महिन्यांपूर्वीच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. त्यावेळी एक नाव चांगलंच चर्चेत होतं. ते नाव होतं पूजा ददलानी, जी शाहरुखची मॅनेजर आहे. पूजा ददलानी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते.
गेल्या 11 वर्षांपासून पूजा ददलानी शाहरुख खानसोबत काम करत आहे. ती 2012 पाहून शाहरुख सोबत काम करतीये, तेव्हापासून ती सतत त्याच्याशी जोडलेली आहे. विशेष सांगायचं झालं तर या वर्षांत पूजाने केवळ प्रसिद्धीच नाही तर भरपूर संपत्तीही कमावली आहे. आज ती करोडोंच्या मालमत्तेची मालकीण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीचा एक वर्षाचा पगार 7 ते 9 कोटी इतका आहे. त्यामुळे ती अतिशय विलासी जीवन जगते. तसंच, जर तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, 2021 च्या अहवालानुसार, ती 45 ते 50 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे.
2023 च्या सुरुवातीला पूजानं एका नवीन घर घेतलं , ज्याची डिझाइन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली होती. पूजाने गौरीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना याबाबतची माहिती दिली होती.
पूजा ददलानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, 2018 मध्ये तिनं हितेश गुरानी नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. हितेन हा एक बिझनेसमन आहे. तसंच या दोघांनाही एक मुलगी आहे.