मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files Movie) हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आजपासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळतेय. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरअभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात.” असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.
शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट
‘द कश्मीर फाईल्स‘ या सिनेमाबाबत शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. “प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात.” असं शरद पोंक्षे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
अनुपम खेर यांची पोस्ट
“तुमच्या आशिर्वादामुळे मी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात स्वत:चं नाव कमावू शकलो. पण ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात मी कुठलाही अभिनय नाही केला. तो जिवंत इतिहास आहे”, असं अनुपम खेर म्हणालेत.
चित्रपटातील कलाकार
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळतेय.
संबंधित बातम्या