मुंबई : काल पंजाब विधानसभा निवडणुकीचा (Punjab election) निकाल लागला. यात अनेक दिग्गजांना हार पत्करावी लागली. यात सोशल मीडिया स्टार्सचाही समावेश आहे. सोशल मीडियास्टार सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewala) यालाही या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला आहे. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. पण त्याला मिळालेली मतं पाहिली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सिद्धू मूसवाला याला सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूने पंजाबच्या मनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला 36 हजार 700 मतं मिळाली आहे. सिद्धूसोबतच सोनू सूदची बहिण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) हिचाही पराभव झाला आहे.
सोशल मीडिया स्टार निवडणुकीत फ्लॉपस्टार
सिद्धू मूसवाला याला सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूला इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोव्हर्स आहेत. सिद्धूने पंजाबच्या मनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला 36 हजार 700 मतं मिळाली आहे. तर आपचे उमेदवार विजय सिंगला यांनी सिद्धूला 63 हजार 323 मतांनी हरवलं आहे. सिंगला यांना 1 लाख 23 मतं मिळाली आहेत. त्यामुळे सोशल मीडिया स्टार निवडणुकीच्या रिंगणात मात्र फ्लॉपस्टार ठरलाय.
कोण आहे सिद्धू मूसवाला?
सिद्धू मूसवाला शेतकरी आंदोलनादरम्यान चर्चेत आला होता. त्याने या आंदोलनावर गाणंही लिहीलं होतं. त्याने एक सिनेमा केला आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
सोनू सूदची बहिण मालविका सूद सच्चरचा पराभव
सोनू सूदची बहिण बहिण मालविका सूद सच्चरचाही पराभव झाला आहे. मालविका पेशाने इंजिनिअर आहे. ती कोचिंग सेंटरही चालवते. शिवाय ती शिक्षण क्षेत्रातही काम करते. कोरोना काळात सोनू सूदने अनेकांना घरी जाण्यास मदत केली. याचाही ती भाग होती.
संबंधित बातम्या