मुंबई : एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने (RRR Movie) पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई करतोय. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.
RRR ची भारतातील कमाई
आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे.
शुक्रवार- 19 कोटी रुपये
शनिवार- 24 कोटी रुपये
रविवार- 31.50 कोटी रुपये
सोमवार – 17 कोटी रुपये
एकूण- 91.50 कोटी रुपये
#RRR #Hindi RRRoars and scores on the crucial make-or-break Mon… BIGGEST Day 4 [post pandemic]… FANTASTIC HOLD everywhere, especially in mass circuits… Will cross ? cr today [Tue; Day 5]… Fri 19 cr, Sat 24 cr, Sun 31.50 cr, Mon 17 cr. Total: ₹ 91.50 cr. #India biz. pic.twitter.com/Kne7GPi759
— taran adarsh (@taran_adarsh) March 29, 2022
RRRची जगभरातील कमाई
RRRची जगभरात क्रेझ आहे. जगभरात रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे. राजामौलींच्या या बिग बजेट चित्रपटाने जरी 500 कोटींपर्यंत गल्ला जमवला असला तरी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा पहिल्या वीकेंडचा विक्रम अबाधित राहिला. बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 526 कोटी रुपये कमावले होते.
पहिला दिवस- 257.15 कोटी रुपये
दुसरा दिवस- 114.38 कोटी रुपये
तिसरा दिवस- 118.63 कोटी रुपये
एकूण- 490.16 कोटी रुपये
#RRRMovie WW Box Office
Rare milestone of HAT-TRICK ?+ cr
Day 1 – ₹ 257.15 cr
Day 2 – ₹ 114.38 cr
Day 3 – ₹ 118.63 cr
Total – ₹ 490.16 cr#RamCharan #JrNTR— Manobala Vijayabalan (@ManobalaV) March 28, 2022
सिनेमासाठी थिएटरबाहेर गर्दी
सध्या दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर तुफान आलंय. हा सिनेमा बॉक्सऑफिससह सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. काही थिएटर बाहेर रांगा लागल्याचं पहायला मिळेतय.
संबंधित बातम्या