सनी लियोनी. हे नाव माहीत नाही, असा माणूस शोधावा लागेल. सनी लियोनी अल्पावधीत प्रसिद्ध झाली. बॉलिवूडमध्ये येताच तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांनी घायाळ केलं. तिच्या नावाची आजही तितकीच रंगते. 13 मे हा दिवस सनी लियोनीसाठी (Sunny Leone) खास आहे. कारण आज तिचा वाढदिवस आहे. खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण सनी लियोनीनं 42च्या वर्षात पदार्पण केलंय. 41वा वाढदिवस ती सेलिब्रेट करतंय. तिच्या वाढदिवशी तिनं सांगितलेला तिच्या नवऱ्यासोबतचा किस्सा चर्चेत आलाय. सनी लियोनीचं खरं नाव (Sunny Leone Real Name) करणजीत कौर वोहरा आबे. तिचा जन्म एका शिख कुटुंबात झाला. कॅनडामध्ये ती लहानाची मोठी झाली. तिच्याकडे कॅनडा आणि अमेरिकेचं नागरीकत्व आहे. सिनेमांत काम करणाऱ्या सनी लियोनीचं आयुष्यही एखाद्या सिनेमाच्या स्टोरी (Love Story) इतकंच खतरनाक आहे. एका मुलाखतीमध्ये सनी लियोनीनं आपल्या पतीबाबतचा किस्सा सांगितलाय. सनी लियोनीच्या पतीचं नाव डेनियल वेबर आहे. डेनियलशी झालेली सनी लियोनीची भेट ही एक इंटरेस्टिंग आठवण असल्याचं सनी लियोनीनं एका मुलाखतीमध्ये म्हटलंय.
सनी आणि डेनियन एकमेकांचे पती पत्नी आहेत. त्याआधी त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. लव्ह मॅरेज केलेल्या या दोघांची भेट कशी झाली, याचा किस्सा सनी लियोनीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय. लॉस वेगसमध्ये एक शूटहोतं. त्यावेळी सनी या शूटसाठी आपल्या मैत्रिसोबत तिथं गेली होती. तेव्हा ती बरीच निराश होती. कारण नुकताच सनी लियोनीचा ब्रेकअप झाला होता.
ब्रेकअपनंतर सिंगल झालेल्या सनी लियोनी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं ठरवलं होतं. सिंगल राहत वेगवेगळी ठिकाणी फिरायचं, वन नाईट स्टँन्ड करायचा, भरपूर प्यायचं, वेगवेगळ्या लोकांना भेटायचं, असं तिनं मनाशी पक्क केलं होतं.
त्याच दरम्यान सनी लियोनीची नजर डेनियलवर पडली आणि सनी म्हणाली, वा, बॅड बॉय! सनीनं डेनियला बॅड बॉय जरी म्हटलं असेल, पण डॅनियल बरोबर उलट निघाला, असंही तिनं नंतर म्हटलंय.
खरंतर डॅनियलला पहिल्यांदा सनीनं पाहिलं तेव्हा तिच्यासोबत तिची मैत्रिणही होती. या मैत्रिणीच्या हातात हात घालून सनी असल्यामुळे डॅनियलचा मोठा गैरसमज झाला. डॅनियनलला वाटलं सनी लियोनी लेसबियन आहे. पण नंतर शूट करत असताना सनीला डॅनियल हाच आपल्यासाठी योग्य पार्टनर आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर एका खास वॅलेन्टाईनला दोघांची लव्हस्टोरी पुढे सुरु झाली.
लग्नानंतर डॅनियल पती म्हणून कसाय, असाही प्रश्न सनीला विचारण्यात आला होता. यावेळी सनी लियोनीनं डॅनियल हा फारच लाजरा बुजरा आहे, असं म्हटलं होतं.