मुंबई : सुपरस्टार आर. माधवन याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकण्यात आली आहे. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करून ही बातमी दिली आहे. अनुराग ठाकुर यांच्या ट्वीटनंतर अभिनेता आर. माधवन यानेही उत्तर देत आभार व्यक्त केले आहे. “या सन्मानासाठी मी मनापासून आभार मानू इच्छितो. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.”, आर माधवन याने लिहिलं आहे. आर. माधवन यांच्या आधी फिल्म मेकर शेखर कपूर या पदावर होते. पण त्यांचा कार्यकाल 3 मार्च 2023 रोजी संपला आहे. नुकतंच आर माधवन याच्या फिल्म ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “आर माधवन यांना एफटीआयआय आणि गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष झाल्याप्रकरणी हार्दिक शुभेच्छा. मला विश्वास आहे की तुमचा दीर्घ अनुभव आणि नैतिकता या संस्थेला समृद्ध करेल. सकारात्मक बदल होतील आणि उच्च स्तरावर लौकीक पोहोचेल. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.”
Heartiest congratulations to @ActorMadhavan ji on being nominated as President of @FTIIOfficial and Chairman of the governing council.
I'm sure that your vast experience & strong ethics will enrich this institute, bring positive changes, & take it to a higher level. My best…
— Anurag Thakur (@ianuragthakur) September 1, 2023
Thank you so very much for the honor and kind wishes @ianuragthakur Ji. I will do my very best to live up to all the expectations. 🙏🙏 https://t.co/OHCKDS9cqt
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) September 1, 2023
काही दिवसांपूर्वी आर. माधवन याची बरीच चर्चा रंगली होती. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरसाठी आर माधवन याने हजेरी लावली होती. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा आर माधवन याने इंस्टाग्रामवर डिनरचे काही फोटोही शेअर केले होते आणि दोन्ही नेत्यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रानसच्या राष्ट्रीय दिवसासाठी मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं.
आर. माधवन याने 2001 मध्ये रहना तेरे दिल में या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. माधवनने या व्यतिरिक्त रंग दे बसंती, 3 इडियट्स, तनु वेड्स मनु आणि तनु वेड्स मनु रिटर्न्ससारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचं प्रत्येक वेळी कौतुक झालं आहे. आर. माधवन याच्या फिल्म रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चिच्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनातील संघर्षावर आहे. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, नंबी नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला होता. त्यानंतर यातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही इंजिन बनवलं.
भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) ची स्थापना 1960 मध्ये पुण्याच्या प्रभात स्टुडिओ परिसरात भारत सरकारकडून केली होती. चित्रपट निर्मितीत प्रभात स्टुडिओचा मोठा हातभरा होता. या संस्थेत नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, राजकुमार राव यासारख्या अभिनेत्यांनी शिक्षण घेतलं आहे.