मुंबई : ‘गुत्थी’ आणि ‘डॉ. ‘मशहूर गुलाटी’ या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) याच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया झाली. त्याला कॉमेडीच्या दुनियेचा बादशाह (Comedy King) म्हटलं जातं. त्याच्या विविध कामांतून तो लोकांना खळखळून हसवतो. आताही त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ज्यामुळे त्यांना अपार आनंद होणार आहे. कारण प्रेक्षकांचा लाडका सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा त्याच्या कामाला लागला आहे. त्याने नुकतंच एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सुनीलने ब-याच दिवसांनंतर काल संध्याकाळी एका कार्यक्रमाला जाहीर हजेरी लावली.सुनीलने पुन्हा एकदा कॉमेडी शोमधून डॉक्टर गुलाटीची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
सुनील ग्रोव्हरला कॉमेडीच्या दुनियेचा बादशाह म्हटलं जातं. त्याच्या विविध कामांतून तो लोकांना खळखळून हसवतो. आताही त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ज्यामुळे त्यांना अपार आनंद होणार आहे. कारण प्रेक्षकांचा लाडका सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा त्याच्या कामाला लागला आहे. त्याने नुकतंच एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सुनीलने ब-याच दिवसांनंतर काल संध्याकाळी एका कार्यक्रमाला जाहीर हजेरी लावली.सुनीलने पुन्हा एकदा कॉमेडी शोमधून डॉक्टर गुलाटीची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. इतक्या दिवसांनी सुनीलचा होत असलेला हा लाईव्ह शो पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यांचा शो हाऊसफुल्ल होता. ब-याच दिवसांनी सुनील ग्रोव्हरला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक दिसले. जेव्हा प्रेक्षकांना या कार्यक्रमाची माहिती मिळाली तसं त्यांनी या शोचं ऑनलाइन तिकीट आधीच बुक केलं. त्याला पाहून त्याच्या चाहत्यांनी सुनील-सुनील असा एकच नारा दिला आणि चाहत्यांसमोर सादरीकरण करताना सुनीलही खूश दिसला.
सुनीलवर काही दिवसांआधी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये सुनीलवर हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. सुनील ग्रोवरच्या हृदयात ब्लॉकेज होते आणि त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता त्याची प्रकृती आता स्थिर आहे. शूटिंगमुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती.
“मी सुरुवातीपासूनच मिमिक्री करण्यात चांगला होता. मला अभिनयाची आवड होती. लोकांना हसवायला मला सुरुवातीपासूनच आवडत असे. मला आठवतं, मी बारावीत होतो, तेव्हा मी नाटक स्पर्धेत भाग घेतला होता. प्रमुख पाहुण्यांनी मला सांगितले की मी त्यात भाग घेऊ नये, कारण बाकीच्यांवर अन्याय होईल. मी थिएटरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, अभिनयासाठी मुंबईला शिफ्ट झालो. त्यानंतर खूप मेहनत घेतली. अखेर कष्टाचं फळ मला मिळालं”, असं सुनील म्हणाला होता.
संबंधित बातम्या