मुंबई : द काश्मीर फाइल्स (The Kashmir File) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या सिनेमा न घेण्याचं जाहीर केलंय. त्यांना एका मुलाखतीत कंगना रनौतला तुमच्या सिनेमात घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी हे उत्तर दिलंय. “मला कोणत्याही स्टारची गरज नाहीये मला फक्त एक कलाकार हवाय जो उत्तम अभिनय करू शकेल. जेव्हा मी 12 वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारासोबत काम करणं मला आवडतं”, असं अग्नीहोत्री म्हणाले.
अग्नीहोत्री काय म्हणाले?
दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रनौतला तुमच्या सिनेमात घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी हे उत्तर दिलंय. “मला कोणत्याही स्टारची गरज नाहीये मला फक्त एक कलाकार हवाय जो उत्तम अभिनय करू शकेल. जेव्हा मी 12 वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारासोबत काम करणं मला आवडतं”, असं अग्नीहोत्री म्हणाले.
दरम्यान, द काश्मीर फाईल्स सिनेमा पाहिल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. “द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात”, असं ती म्हणाली. ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल कंगनाने पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. याआधीही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.
संबंधित बातम्या