मुंबई : सध्या ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kasmir Files) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. या सिनेमाला अनेक राज्यात टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. अश्यातच आता उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) राज्यातही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogin Adityanath) यांच्याकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सोबतच गुजरात (Gujrat) हरियाणा (Hariyana), कर्नाटक (Karnatak), त्रिपुरा (Tripura) आणि उत्तराखंड (Uttarakhand या राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. भाजप शासित राज्यात या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये तर भाजपसोबतच काँग्रेसच्या आमदारांनीही चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.
उत्तर प्रदेशात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री
उत्तर प्रदेश राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे निर्देश दिले आहेत.
या राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री
गुजरात, हरियाणा , कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. भाजपशासित राज्यात या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राजस्थानमध्ये टॅक्स फ्रीची मागणी
महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये तर भाजपसोबतच काँग्रेसच्या आमदारांनीही चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.
काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात…. असे गृहमंत्री @Dwalsepatil विधानसभेत म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, पण महाराष्ट्रात हिंदूंना एकत्र करण्याची चोरी झाली आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 15, 2022
‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करा, भाजपची मागणी
‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी विधीमंडळात करण्यात आली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली आहे.