देशाच्या विरोधात भयंकर कटकारस्थान रचलं; प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्रीला अटक

| Updated on: Feb 06, 2025 | 11:32 PM

प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला देशविरोधी षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ढाकामध्ये तिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे बांगलादेशात खळबळ उडाली आहे.

देशाच्या विरोधात भयंकर कटकारस्थान रचलं; प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्रीला अटक
Meher Afroz Shaon
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिला अटक करण्यात आली आहे. देशाच्या विरोधात भयंकर षडयंत्र रचल्याचा तिच्यावर आरोप आहे. तिला बांगलादेशची राजधानी ढाका येथील धानमंडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मेहरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशात आधीच राजकीय अस्थिरता असतानाच आता कलाकारांनाही अटक होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.

मेहर अफरोज शॉन हिला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रेजाउल करीम मलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मेहर ही देशाविरोधात षडयंत्र रचण्याच्या कटात सामील होती, असं मलिक यांनी म्हटलंय. दरम्यान या प्रकरणाची अजून डिटेल्स आलेली नाहीये. उद्या शुक्रवारी पोलीस तिला कोर्टात हजर करून तिची रिमांड मागण्याची शक्यता आहे. रिमांडवर घेऊन तिची कसून चौकशी करायची आहे. त्यामुळे तिला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Meher Afroz Shaon

मेहर अफरोज शॉन ही बांगलादेशची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती गायिका, नृत्यांगणा आणि सिने दिग्दर्शिका सुद्धा आहेत. तिने बालकलाकार म्हणून सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिने अनेक सिनेमा आणि नाटकात काम केलं होतं.

37 वर्षापूर्वी करिअर सुरू

मेहर अफरोजने 37 वर्षापूर्वी तिचं करिअर सुरू केलं होतं. 1988 मध्ये ‘स्वधिनोता’ नावाच्या टीव्ही सीरिअलमध्ये तिने काम केलं होतं. या सीरिअलमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. त्यानंतर तिने अमर् अचे जोल् (2008), श्यामोल छाया (2004), चंद्रकोथा (2003), आज रोबीबार (1996) सारख्या टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं.

देशाविरोधात कट रचल्याचा आरोप झाल्याने आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या चौकशीत आणखी काय पुढे येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तिच्या सोबत तिच्या कटात आणखी कोण कोण सामील आहेत, हे ही लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. तिच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत सांगायचं म्हणजे तिने लेखक, दिग्दर्शक हुमायूँ अहमद यांच्याशी विवाह केला आहे. मेहरला नॅशनल अॅवार्डही मिळालेला आहे. 2016 मध्ये Krishnopokkho नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमासाठी बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरच्या कॅटेगिरीत तिला नॅशनल अॅवार्ड मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ती अधिकच चर्चेत आली होती.