मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही सध्या चांगली चर्चेत आहे. उर्फी जावेद ही तिच्या विचित्र आणि अनोख्या फॅशनमुळे ओळखली जाते. ती नेहमी अतरंगी फॅशन करताना दिसते, त्यामुळे सोशल मीडियावर नेहमी उर्फीची चर्चा सुरू असते. तिने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवलेले ड्रेस परिधान केले आहेत. यामध्ये मग घड्याळ असो टॉयलेट पेपर असतो किंवा किवी फळ असो अशा अनेक गोष्टींपासून तिनं अतरंगी फॅशन केली आहे. उर्फीच्या या अतरंगी फॅशनमुळे तिला नेहमी ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो. पण काही वेळा तिची ही फॅशन नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरते.
आता देखील उर्फी तिच्या अनोख्या फॅशन स्टाईल मुळे चर्चेत आली आहे. उर्फीला शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी जेव्हा ती तिच्या कारमधून बाहेर उतरली तेव्हा तिची फॅशन स्टाईल पाहून सर्वच चकित झाले आहेत. सध्या तिचा हा अनोखा ड्रेस पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. सर्वांच्याच नजरा तिच्या या अनोख्या फॅशनवर टिकून राहिल्या आहेत.
उर्फीनं आता काळ्या रंगाचा ड्रैगन कट आउट ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. तसंच या ड्रेसच्या आत मध्ये उर्फीनं काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. या ड्रेसवरती तिनं काळ्या रंगाचे झुमके घातले होते. सोबतच तिने हलका मेकअप करत या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. यामध्ये काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.