बॉलिवूडचे कलाकार अनेकदा स्पॉट होत असतात, बऱ्याचदा त्यांच्यासोबत अशा काही घटना घडतात ज्यामुळे त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. शनिवारी अभिनेत्री ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली, यावेळी आराध्यासोबत असा प्रसंग घडला ज्यामुळे ऐश्वर्या राय टेन्शमध्ये आल्याचं पाहायला मिळालं.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऐश्वर्या आणि आराध्या दोन्ही सोबत चालल्या आहेत. त्याचवेळेस अचानक आराध्या उसळी घेते.ज्यामुळे ऐश्वर्याला वाटतं की आराध्याला पाठीमागून कोणी तरी धक्का दिला आहे. त्यामुळे ऐश्वर्या जरा चिडूनच आराध्याला विचारले की तूला कोणी धक्का दिला आहे का? मात्र ऐश्वर्याच्या या प्रश्नावर आराध्या काहीच उत्तर दित नाही. ती फक्त हसून पुढे जाते. यावेळी आराध्याला खरच कोणी धक्का मारला होता का? हे या व्हिडीओमधून समोर आलेलं नाहीये, मात्र आराध्या ज्या पद्धतीने हसत होती त्यावरून तरी तिला कोणी धक्का मारला नसेल असं वाटत आहे. मात्र अजूनही नेमकं काय घडलं हे समोर आलेलं नाहीये.
अभिषेक बच्चन देखील होता सोबत
याच एअरपोर्टवरील आराध्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन देखील ऐश्वर्या आणि आराध्यासोबत दिसत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक आपली मुलगी आराध्यासोबत एकत्र दिसून आले, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, त्यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे.
हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवरील आहे, पहाटेच्या सुमारास ते तिघे मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. याचदरम्यान आराध्यासोबत ही घटना घडली.त्या तिघांना एकत्र पाहून त्यांचे फॅन असा अंदाज लावत आहेत की, ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या मुलीसोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते, ते आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतले आहेत.