मुंबई : द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरून सध्या दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय हे अर्धसत्य आहे. तर भाजप नेते यावर कौतुकाच्या फुलांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत. मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपळी नाहीये. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजावेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक, असे म्हणताना ते दिसून येत आहे. त्यामुळे आता चांगलाच वाद पेटला आहे. याच वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पत्रकार रोहित पांडे (Rohit Pandey) यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे मुळचे भोपाळचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत विवेक अग्निहोत्री यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
अग्निहोत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत. मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपळी नाहीये. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजवेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक, असे म्हणताना ते दिसून येत आहे. त्यामुळे आता चांगलाच वाद पेटला आहे. याच वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार रोहित पांडे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे मुळचे भोपाळचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत विवेक अग्निहोत्री यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
इस दोयम दर्जे की मान्यता के लिए मेरी ओर से..#I_M_Sorry_Bhopal
भोपाली होना होमोसेक्सुअल होना कैसे हो सकता है..?
लखनऊ,हैदराबाद,मैसूर भी तो नवाबी शहर हैं..तो क्या वहां भी..! छि:
अगर हम भी कहते फिरें कि तनु श्री दत्त आपको लेकर ऐसा बोलती है तो क्या आप मान लेंगे.!@vivekagnihotri pic.twitter.com/teh5fmixZ0
— Govind ਗੋਵਿੰਦ گووند गोविंद गुर्जर (@govindtimes) March 25, 2022
दिग्विजय सिंह यांनी विवेकवर निशाणा साधत ट्विट केलं. दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे की, विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळी रहिवाशाचा नाही. मी 77 पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिला असाल त्यामुळे हा “संगतीचा प्रभाव असू शकतो”. व्हायरल होत असलेले विवेक अग्निहोत्री यांचे विधान केव्हा आणि कोणत्या संदर्भात ते म्हणाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या