मुलायम त्वचा,सौंदर्यासाठी ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चेहऱ्याला चक्क तिची थुंकी लावते; स्वत:च केला खुलासा

| Updated on: Jan 08, 2025 | 4:38 PM

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी, तिच्या नितळ आणि मुलायम त्वचेसाठी ओळखली जाते. पण तुम्हाला तिचे ब्युटी सिक्रेट ऐकून धक्का बसेल. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी चक्क तिची थुंकी लावते.

मुलायम त्वचा,सौंदर्यासाठी ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चेहऱ्याला चक्क तिची थुंकी लावते; स्वत:च केला खुलासा
Follow us on

बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यांसाठी नेहमीच मेहनत घेत असतात. तसेच आपल्या चाहत्यांसोबत अनेकदा त्यांचे स्किनकेअरच्या टिप्सही शेअर करतात. अभिनेत्रींच्या स्किन केअर टिप्सपासून ते प्रोडक्टसपर्यंत सर्वच गोष्टींसाठी चाहते त्यांना फॉलो करतात. आणि बऱ्याच अभिनेत्रींचे स्वत:चे असे ब्युटी प्रोडक्टसचे ब्रॅंड आहेत.

अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या सौंदर्यासाठी जी टिप्स वापरते ती सांगितली. आणि ती टिप्स ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

सुंदर त्वचेसाठी तमन्ना भाटीया लावते थुंकी

ही अभिनेत्री तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी ती तिच्या थुंकीचा वापर करते. होय, ती चेहऱ्याला चक्क तिची लाळ लावते. याबाबत स्वतः या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

ही अभिनेत्री आजवर साऊथ ते बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.वेगवेगळ्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने तिने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया.

तमन्ना तिच्या चित्रपटांपेक्षा ती तिच्या पर्सनल लाइफमुळे जास्त लाइमलाईटमध्ये राहते. तिचं सौंदर्य अनेकांना भुरळ घालतं. त्यामुळेच, ती तिची त्वचेची काळजी कशाप्रकारे घेते हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

तमन्नाच्या या ब्युटी टिप्सचे अनेक फायदे 

एका मुलाखतीत तिच्या स्किनकेअर रुटीनबद्दल सांगितले की, ती सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर तिची लाळ लावते. सुरुवातीला तिलाही हे खूप विचित्र वाटायचे, मात्र नंतर तिला याचे फायदे समजले. तमन्नाने सांगितले, की असे केल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरुमे, दाणे कमी होऊ लागतात. म्हणूनच तिला जेव्हाही पिंपल्स येतात, ती काही दिवसांसाठी ही गोष्ट फॉलो करते. असे केल्याने तिला अनेकवेळा फायदा झाला आहे.


तमन्नाची त्वचा इतकी नितळ आणि तेजस्वी आहे, की अनेकांना तिचे स्किनकेअर जाणून घ्यायचे असते. तिच्या चेहऱ्यावरही कोणतेही पिंपल नाहीयेत याचं कारण तिने हेच सांगितलं आहे.

लग्न आणि मुलांबाबतही आहेत वेगळे विचार 

दरम्यान तमन्ना भाटीया करोडोंची मालकीण आहे. तसेच स्किन केअरची अजब टिप्स देणाऱ्या तमन्नाने लग्न आणि मुलांबाबतही तिचे मत मांडले होते. तमन्ना म्हणाली होती की सुरूवातीला तिला वाटले होते की ती जास्तकाळ या इंडस्ट्रीमध्ये तग धरू शकणार नाही.

अशात तिने विचार केला की ती 10 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करेल आणि त्यानंतर लग्न करेल. पण तिला मुलांना जन्म द्यायला भीती वाटते. तिला ही भीती वाटते की ती मुलांचा सांभाळ कसा करेल. तिच्या स्टेटमेंटमुळेही बरीच चर्चा झाली होती.

सोबतच तिने जी ब्युटी टिप्स सांगितली ती जाणून तर नक्कीच सर्वांनाच आश्चर्य वाटले. तिच्या या लाळ लावण्याच्या ब्युटी टिप्स वर अनेकांनी कमेंटस् केल्या आहेत.