बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या कान्स 2023 (Cannes 2023) मध्ये तिचा जलवा दाखवत आहे. नवनवे आणि अनोख्या लूकने ती सगळ्यांनाच तिचे फॅन बनवत आहे. अलीकडेच, तिने कान्सच्या रेड कार्पेटवर गळ्यात मगरीचा नेकलेस घातल्याने उर्वशी चर्चेत आली होती. आणि यातात तर या फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी तिने निळी लिपस्टीक लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे तिची पुन्हा चर्चा सुरू झाली असून या लूकमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.
76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅम लुकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रोड कार्पेटवर पोहोचली तेव्हा तिचा लूक सर्वत्र चर्चेचा भाग बनला. उर्वशीने तिसऱ्या दिवशी निळा आणि पांढरा ऑफ शोल्डर प्रिन्सेस गाऊन निवडला. या गाऊनमध्ये तिने जबरदस्त पोजही दिल्या. पण तिच्या सुंदर पोशाखापेक्षा तिच्या इंक-ब्ल्यू रंगाच्या लिपस्टिकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
उर्वशी रौतेलाचे कान्समधील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे पाहून सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण म्हणतात की उर्वशी रौतेला डिस्नेच्या खलनायिकेसारखी दिसत आहे. तर कोणी म्हणतं की अशा प्रकारे लिपस्टिक लावून ती ऐश्वर्या रायचा लूक कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. “जेव्हा तुम्ही पेन चघळत असता आणि ते गळू लागते.” अशी कमेंटही एका यूजरने तिच्या फोटोवर केली आहे.
काही लोकांनी ती ऐश्वर्या रायला कॉपी करत असल्याचाही आरोप केला. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनही कान्समध्ये जांभळ्या रंगाची लिपस्टीक लावून आली होती. दुसर्याने लिहिले, “ती यावर्षीच्या कान्समध्ये ऐश्वर्याला कॉपी करत आहे का?” तर दुसर्याने टिप्पणी केली, “मी हे बोलत आहे यावर माझा विश्वास बसत नाही पण मला वाटते की ती या लूकमध्ये चांगली दिसत आहे.” एका यूजरने लिहिले की, “ती डिस्ने व्हिलनसारखी दिसते.” सर्वात शेवटी, दुसर्याने लिहिले, “ती अॅश सारखा तिचा लूक कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे.” काही युजर्स उर्वशीच्या समर्थनात आहेत आणि तिच्या लूकचे कौतुक करताना दिसले.