कोरिओग्राफर रेमो डिसुजा आणि त्याच्या पत्नीसह 7 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

| Updated on: Oct 19, 2024 | 7:51 PM

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुजा आणि पत्नीसह सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. रेमो याच्यावर यापूर्वी देखील फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.

कोरिओग्राफर रेमो डिसुजा आणि त्याच्या पत्नीसह 7 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
Follow us on

प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझा याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या विरोधात फसवणूकीचे प्रकरण दाखल केले आहे. रेमो याच्यासह 7 लोकांवर 11.96 कोटीची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. वृत्त संस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई जवळील ठाण्यातील एका पोलिस ठाण्यात रेमो आणि त्यांची पत्नी लिजेल तसेच पाच अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांना 19 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात माहिती दिली आहे.एका 26 वर्षींय डान्सरने त्यांच्या विरोधात मीरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या लोकांवर गुन्हा दाखल

रेमो आणि त्यांची पत्नी यांच्या शिवाय ज्या पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. अन्य चार जणांनी नावे. ओमप्रकाश शंकर चौहान, रोहीज जाधव, विनोद राऊत आणि रमेश गुप्ता अशी आहेत.

बक्षिसाची रक्कम हडपल्याचा आरोप

या प्रकरणात रेमो याच्या विरोधात ज्याने तक्रा दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार तक्रारदार आणि त्याच्या मित्रांसोबत कथितरित्या साल 2018 ते 2024 पर्यंत फसवणूक करण्यात आली. या ग्रुपने एक टीव्ही डान्स शोमध्ये परफॉर्म केला होता आणि विजेता देखील ठरला होता. या ग्रुपला आपला ग्रुप म्हणून रेमो आणि अन्य जणांना सादर केले होते. परंतू ग्रुप जिंकल्यानंतर कॅश प्राईज मिळाल्यानंतर त्यांच्याकडून 11.96 कोटी रुपये हडपण्यात आले. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आठ वर्षांपूर्वी देखील गुन्हा दाखल

रेमो याच्या विरोधात आठ वर्षांपूर्वी देखील पाच कोटीच्या फसवणूकीची केस दाखल झाली होती. तक्रारकर्त्याने आरोप केला होता की चित्रपट करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन रेमोने त्याची फसवणूक केली होते असा त्याचा दावा होता. पाच कोटी घेऊन त्याबदल्यात दहा कोटी देण्याचे वचन रेमोने पाळले नाही असा त्याचा आरोप होता.ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणात अहलाबाद हायकोर्टात सुनावणी झाली. रेमोला दिलासा देणारी याचिका कोर्टाने फेटाळली होती.