मुंबई : सन 2021 मध्ये अनेक चित्रपट चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यावर्षात अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार आहे. इतिहासात प्रथमच वडील आणि मुलाच्या चित्रपटात टक्कर होणार आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे ‘द बिग बुल’ आणि ‘चेहेरे’ चित्रपट होणार आहेत. बिग बुल ओटीटी प्लॅटफॉर्म 8 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे आणि 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे.
बिग बी आणि अभिषेकनं बर्याच सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे मात्र बॉक्स ऑफिसवर दोघं एकत्र धडकण्याचं पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. तेही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. दोघांनी बंटी औंर बबली, सरकार आणि पा यासारख्या बर्याच चित्रपटात काम केलं आहे.
कोण मारणार बाजी
अभिषेक बच्चन यावेळी बाजी मारण्याची शक्यता आहे कारण यावेळी देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहेत, अशा परिस्थितीत लोक सिनेमागृहांकडे जाण्याऐवजी घरीच राहून चित्रपट पाहणं पसंत करणार आहेत. अशा परिस्थितीत अभिषेक बच्चन यांच्या ‘बिग बुल’ या चित्रपटाचा फायदा होऊ शकतो. कोरोनाचं वाढतं प्रमाण बघता राज्यात पूर्ण क्षमतेनं थिएटर उघडण्याचा निर्णय घेणं शक्य दिसत नाही त्यामुळे चेहरे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर परिणाम होऊ शकतो. ही आहे
‘द बिग बुल’ची कथा
द बिग बुलमध्ये अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रूझ आणि निकिता दत्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 1992 मधील भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर द बिग बुल हा चित्रपट आधारित आहे. हर्षद मेहता हे शेअर बाजारातील एक मोठे नाव आहे. हर्षदन अनेक आर्थिक गुन्हे केले आहेत, त्यामुळे त्याला अटक करण्यात आलीये. हा चित्रपटाची निर्मिती अजय देवगन आणि आनंद पंडित करत आहेत.
चेहरे या चित्रपटाची कथा
चेहरे हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केलं आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट म्हणून चेहरे मानला जातोय. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे.
संबंधित बातम्या
Photo : ‘कपल गोल्स’, नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे रोमँटिक फोटो