Horror Film: ‘छोरी 2’चा थरकाप उडवणारा टीझर; सैफ अली खानची बहिण खास भूमिकेत

| Updated on: Mar 25, 2025 | 2:02 PM

. ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे."

Horror Film: छोरी 2चा थरकाप उडवणारा टीझर; सैफ अली खानची बहिण खास भूमिकेत
Chhorii 2 teaser
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

2025 मध्ये अनेक नवीन सिनेमे आले आणि येणार आहेत. आगामी काही सिनेमांचे ट्रेलर अन् टिझर प्रदर्शित झाले आहेत. अनेकांना ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकताही आहे. तसेच काही चित्रपटांची घोषणा झाली आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष प्रेक्षकांसाठी चित्रपटांची मेजवानी घेऊन आलं आहे. आता यामध्ये आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट म्हणजे ‘छोरी 2’ .

‘छोरी 2’ चा टीझर प्रदर्शित 

2021 मध्ये, नुसरत भरुचाचा ‘छोरी’ नावाचा एक हॉरर चित्रपट आला होता. हा चित्रपट मराठी ‘लपाछपी’चा रिमेक होता. ‘छोरी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता पुन्हा चार वर्षांनंतर ‘छोरी’चा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुसरत छोरीचा दुसरा भाग घेऊन येत आहे. निर्मात्यांनी ‘छोरी 2’ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे आणि टीझर देखील प्रदर्शित केला आहे.

“पुन्हा तीच भीती”

‘छोरी 2’ चा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला, ज्यामध्ये पहिल्या भागापेक्षा जास्त भयानक आणि जास्त धोका दिसून येतो. नुसरत पुन्हा एकदा साक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी तिच्या मुलीसाठी लढताना दिसतेय. निर्मात्यांनी टीझरमध्ये काही कॅप्शन देखील समाविष्ट केले आहेत. एका ठिकाणी निर्मात्यांनी लिहिले आहे की, “पुन्हा तेच शेत.” अजून एका ठिकाणी लिहिले आहे, “पुन्हा तीच भीती”

सोहा अली खान खलनायिकेच्या पात्रात?

हा टीझर पाहून तुम्हाला भिती तर वाटेल पण सोबतच डोळेही पाणावतील.यावेळी चित्रपटात सोहा अली खानही दिसणार आहे. एका वेगळ्याचं भुमिकेतून सोहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरवरून सोहा खलनायिकेचं पात्र साकारत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अजून काय रंजक पाहायला मिळणार आहे. याची उत्सुकता नक्कीच लागून राहिली आहे.

सोहा दिसणार खास भूमिकेत 

मागील भागाप्रमाणे यावेळीही विशाल फुरिया यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपट लिहिण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर सोहा देखील चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी ती 2023 मध्ये ‘साउंड प्रूफ’ नावाच्या एका लघुपटात दिसली होती. आणि आता तो ‘छोरी’ द्वारे पुनरागमन करण्यास सज्ज आहे. ‘छोरी 2’ व्यतिरिक्त ती ‘ब्रिज’ नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे. त्याची तयारी सध्या सुरु आहे.