मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत नेहमीच गंभीर असते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मलायका अरोराला कोरोनाची लागण झाली होती.
मलायकानं आता तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिनं कोरोनातून बरं होण्याचा पुढील प्रवास सांगितला आहे.
आता तिनं ट्रान्सफॉर्मेशनची स्टोरी फोटोंद्वारे शेअर केली आहे. फोटोमध्ये ती शॉर्ट्ससोबत काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा कॅरी केली आहे, ज्यामध्ये ती आकर्षक दिसत आहे.
फोटो शेअर करत तिनं लिहिलं की, ‘तू खूप भाग्यवान आहेस, तुझ्यासाठी सगळ्याच गोष्टी सहज होत असतील.. असं मी स्वत:साठी नेहमी ऐकते.... खरं सांगायचं तर, मी आयुष्यातल्या बर्याच गोष्टींबद्दल भाग्यवान आहे, पण आपलं नशीब खूप लहान भूमिका पार पाडतं…’
पोस्टमध्ये तिनं पुढे लिहिलं की, ‘5 सप्टेंबर रोजी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं आणि माझ्यासाठी ही खूप कठीण वेळ ती. जो व्यक्ती सांगतो की कोरोनातून बरं होणं सोपं आहे. मी तुम्हाला सांगते, ते फक्त त्यांनाच सोपं आहे ज्यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे. मी यामधून बाहेर पडले आहे, हे सोपं नाही.’
मलायका म्हणाली, ‘कोरोनानं मला शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे मोडलं होतं. घरात दोन पाऊलं चालणं मला खूप अवघड झालं होतं. जेव्हा मी अंथरुणातून बाहेर पडायची त्यानंतर मला माझ्या घराच्या खिडकीजवळ जातानासुद्धा त्रास होत होता. हे सगळंच खूप कठीण होतं. माझं वजन खूप वाढलं होतं. मला खूप अशक्तपणा जाणवत होता. मी माझ्या कुटूंबापासून लांब गेले होते.’
मी शेवटी 26 सप्टेंबर रोजी कोरोना निगेटिव्ह असल्याचं कळल आणि मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी कोरोनाला पराभूत केलं.’
त्याला 32 आठवडे झाले आहेत आणि मी पुन्हा एकदा स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी वर्क आऊट करू शकते. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले आणि सामर्थ्यवान आहे.
मी देवाजवळ प्रार्थना करते की देशभरात पसरलेला हा कोरोना लवकरात लवकर संपेल आणि आपण सर्वजण यातून बाहेर पडू.