मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबरोबर ‘कभी हा,कभी ना’ सारख्या सुपरहिट चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (suchitra krishnamoorthi) यांना कोरोनाची लस (Corona Vaccine) अद्याप मिळू शकली नाहीय. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे (Corona Vaccine Shortage actress suchitra krishnamoorthi share problem on twitter).
ज्या प्रकारे कोरोनाने संपूर्ण देशात पुन्हा डोके वर काढले आहे. त्या भीतीमुळे बहुतेक लोक कोरोना लस प्राथमिकतेने कोरोनाची लास टोचून घेत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचादेखील समावेश आहे. कारण कोरोनाने एकामागून एक अनेक मोठ्या सुपरस्टार्संना आपल्या विळख्यात ओढले आहे. मुंबईतही कोरोना संसर्गाची आकडेवारी दररोज झपाट्याने वाढत आहे, यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ मोडमध्ये गेला आहे.
सुचित्रा यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली की, त्या लस घेण्यासाठी मुंबईच्या लाइफलाईन हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, परंतु तेथे त्यांना ही लस मिळू शकली नाही. त्यांना एका आठवड्यानंतर येण्यास सांगितले आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की, कोरोना लसीची कमतरता ही केवळ अफवा नाही. त्यांनाही स्वतःला देखील या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
#Lifeline in goregaon and #arogyanidhi in JUHU. Mumbai #VaccineShortage . Centres closed
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) April 19, 2021
So I am bng turned back from #Lifeline hospital where i had a scheduled appointment for #COVID19Vaccine made in #cowin website0 . They have RUN OUT of vaccine – vaccine aa hi nahi raha hai. Ek week mein enquiry karo.
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) April 19, 2021
सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी 1997 मध्ये शेखर कपूर यांच्याशी लग्न केले आणि चित्रपट कारकीर्द मध्यावरच सोडली. शेखर कपूर यांनी त्यावेळी ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाद्वारे बरीच प्रसिद्धी मिळविली होती. शेखर त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे आहेत. हे लग्न जवळपास दहा वर्षे चालले. 2007पासून हे दोघे स्वतंत्र राहत होते. दोघांनाही एक मुलगी आहे, जिचे नाव कावेरी आहे आणि ती देखील आपल्या आईसारख्या चित्रपटांत करिअर करण्याची तयारी करत आहे. त्याला नृत्य आणि संगीताची देखील आवड आहे.
सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी आपल्या ‘ड्रामा क्वीन’ या पुस्तकात बरेच खुलासे केले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, आपल्या जीवनात जे घडते ते बहुतेक आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून आपण याबद्दल बोलण्यापासून परावृत्त होऊ नये. ते सर्व आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. जेव्हा आपण याबद्दल स्वतः बोलू इच्छित नाही आणि जेव्हा लोक त्याची थट्टा करतात, तेव्हा त्याचे वाईट वाटते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बोलण्यास तयार असले पाहिजे. जर आपण बोललो नाही, तर बाहेरचे लोक ते नक्कीच करतील.
पती शेखर कपूरपासून विभक्त झाल्यानंतर तिने त्याच्याविरुध्द कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता, ज्यात तिने आपली मुलगी कावेरीसाठी पैशाची मागणी केली होती. असे म्हणतात की प्रिती झिंटा शेखरच्या आयुष्यात आल्या नंतर कविता आणि शेखर यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते.
(Corona Vaccine Shortage actress suchitra krishnamoorthi share problem on twitter)
Rakhi Sawant | आईच्या शस्त्रक्रियेसाठी सलमान खानची मदत, व्हिडीओ शेअर करत राखी सावंत म्हणाली…
Indian Idol 12 | पवनदीप-आशिषला कोरोना, आता सवाई भटची प्रकृती ढासळली, मध्यातच सोडला शो!