मुंबईतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिहारमध्ये मृत्यू, 9 सह कलाकारांवरही काळाने घातली झडप

| Updated on: Feb 27, 2024 | 7:34 PM

भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार आधी एका दुचाकीला धडकली. यामुळे त्यांच्या गाडीची दिशा भरकटली गेली. दोघेही विरुद्ध दिशेने निघाले. त्यामुळे समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची आणि स्कॉर्पिओ यांची जोरदार धडक झाली.

मुंबईतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिहारमध्ये मृत्यू, 9 सह कलाकारांवरही काळाने घातली झडप
BHOJPURI ACTRESS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

पाटणा | 27 फेब्रुवारी 2024 : बिहारच्या कैमूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव आणि गायक विमलेश पांडे उर्फ ​​छोटू पांडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. कैमूरच्या मोहनिया येथे NH2 वर वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओने आधी एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ती एका ट्रकवर जाऊन आदळली. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहनियाचे पोलिस उपअधीक्षक दिलीप कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

जिल्हा पोलिसांनी सर्व नऊ मृतांची ओळख पटवली आहे. मृतांमध्ये अभिनेत्री आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, गायक विमलेश पांडे उर्फ ​​छोटू पांडे आणि गीतकार सत्यप्रकाश मिश्रा यांचा समावेश आहे. याशिवाय प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे आणि बागिश पांडे अशी इतर मृतांची नावे आहेत असे उपअधीक्षक दिलीप कुमार यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार आधी एका दुचाकीला धडकली. यामुळे त्यांच्या गाडीची दिशा भरकटली गेली. दोघेही विरुद्ध दिशेने निघाले. त्यामुळे समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची आणि स्कॉर्पिओ यांची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकी चालकासह कारमधील सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार भोजपुरी गायक छोटू पांडे संपूर्ण टीमसोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशला निघाले होते. हा कार्यक्रम दुर्गावती पोलीस स्टेशन हद्दीतील गोरार गावातील संतोषकुमार पाल यांच्या भावाच्या लग्नासाठी ठेवण्यात आला होता. लग्न घरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या अपघातामुळे भोजपुरी चित्रपट विश्वात एकच शोककळा पसरली आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बक्सरचा रहिवासी भोजपुरी गायक छोटू पांडे, त्याचा पुतण्या अनु पांडे, गीतकार सत्य प्रकाश मिश्रा बैरागी, वाराणसी येथील अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव आणि आंचल तिवारी हे सर्व भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे होते. या घटनेनंतर NH 2 महामार्गावर वाहनकोंडी झाली होती. पोलीसान या गह्त्नेची माहिती मिळताच त्यांनी ही वाहनकोंडी सोडविली. हे सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटल भभुआ येथे पाठवण्यात आले.

कोण आहे आंचल तिवारी

आंचल तिवारी ही भोजपुरीची उगवती स्टार होती. मुंबईतील टिळक नगर येथे ती तहात होती. भोजपुरी चित्रपटापासून तिने अभ्ण्याची कारकीर्द सुरु केली. ॲमेझॉन प्राइमच्या मालिकेतही ती दिसली होती. ‘पंचायत 2’ या वेब सीरिजमध्ये मुख्य अभिनेत्री रिंकी हिची भूमिका साकारणाऱ्या सान्विकाची बेस्ट फ्रेंड रवीना हिची आंचल हिने साकारली होती. गावात एका कार्यक्रमाची तयारी सुरू असताना रिंकी आणि रवीना स्कूटरवरून जात आहेत. यादरम्यान आंचलची व्यक्तिरेखा ठळकपणे दाखवण्यात आली होती. काही मिनिटांच्या या भूमिकेमुळे तिचे नाव चर्चेत आले होते.