Met Gala 2023 : आलियाच्या डेब्यूने दीपिकाला घाम फुटला? मेट गालाला न गेल्याने अभिनेत्री झाली ट्रोल

| Updated on: May 02, 2023 | 10:37 AM

फॅशन जगतातील महा इव्हेंट असलेला मेट गाला इव्हेंट न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला असून अभिनेत्री आलिया भट्ट डेब्यू करत आहे. मात्र, दीपिका पादुकोण या शोमध्ये दिसली नाही. त्याऐवजी तिने तिच्या सोशल मीडियावर ऑस्करचे फोटो टाकले आहेत. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

Met Gala 2023 : आलियाच्या डेब्यूने दीपिकाला घाम फुटला? मेट गालाला न गेल्याने अभिनेत्री झाली ट्रोल
Follow us on

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या मेट गालाची (Met Gala 2023 ) सर्वत्र चर्चा आहे. फॅशनच्या या सर्वात मोठ्या इव्हेंटवर अख्ख्या जगाची नजर आहे. या महा फॅशन इव्हेंटमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या अभिनेत्रींनी भाग घेतला आहे. पण या इव्हेंटमध्ये एक चेहरा दिसला नाही. तो म्हणजे बॉलिवूडची सर्वांग सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दीपिका यंदा मेट गालामध्ये दिसली नाही. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी या फॅशन शोमध्ये धुमाकूळ घातलेला असतानाच दीपिका न दिसल्याने तिच्या हजारो चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. दीपिकाने मेट गाला सुरू होण्यापूर्वी काही तास आधी फोटो शेअर केले होते. त्यामुळे ती मेट गालाला येईल असं वाटत होतं.

आलिया भट्ट मेट गालातून डेब्यू करणार होती. त्यामुळे आलियाला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. तर हजारो नजरा दीपिकाकडेही खिळून होत्या. दीपिका मेट गालात कशा पद्धतीने एन्ट्री घेते याची सर्वांनाच उत्सुकता होती. आलिया मेट गालात आली. यावेळी तिला पाहून दीपिकाच अवतरल्याचा भास झाला. त्याला कारणही तसंच होतं. दीपिकाने कान्समध्ये जसे आऊटफिट घातले होते. तसेच आलियाने यावेळी परिधान केले होते. त्यामुळे आलियाला पाहताच तिच्या चाहत्यांना दीपिकाची आठवण झाली. दीपिकाने मेट गाला सुरु होण्यापूर्वी काही फोटो शेअर केले होते. ये फोटो 2023मधील ऑस्कर पुरस्कारातील होते. हे सर्व बीटीएस फोटो आहेत. म्हणजे मंचावर जाण्यापूर्वीचे आहेत. त्यात दीपिका आपलं भाषण वाचताना दिसत आहे.

 

म्हणून दीपिका ट्रोल झाली

या फोटोत बॅक स्टेजला दीपिकाच्या अॅक्टिव्हिटी दिसत आहेत. मात्र, त्यामुळेच दीपिका ट्रोल झाली आहे. मेट गालाचा शानदार सोहळा सुरू असतानाच दीपिकाने ऑस्करचे फोटो शेअर केल्याने यूजर्सने तिला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावरून तिला भंडावून सोडलं जात आहे. मेट गालामध्ये दिसणार आहेस का? आलियाला घाबरली का? आलिया मेट गालात असल्यामुळे तू आली नाहीस का? असा सवाल यूजर्सकडून तिला केला जात आहे.

 

इतकी इनसिक्योर कशी होऊ शकते ?

एखादी स्त्री इतकी इनसिक्योर कशी होऊ शकते? असा सवाल एका यूजरने केला आहे. आलियाने मेट गालात डेब्यू केला आणि दीपिाक ऑस्करचे फोटो टाकून लाइमलाईटमध्ये येऊ पाहता आहे, असं एकाने म्हटलं आहे. अन्य एका यूजर्सने तिला शुभेच्छा देताना ग्रो अप दीपिका असं म्हटलंय. मेट गालाच्या आधी ऑस्करचे फोटो टाकलेस. तू किती इनसिक्योर व्यक्ती आहेस, असं आणखी एकाने म्हटलं आहे. दरम्यान, मेट गालामध्ये यापूर्वी दीपिकाने आपल्या अदाकारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.