Deepika Padukone : बहिणीच्या सौंदर्यापुढे दीपिकाचा ग्लॅमर फेल, हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

| Updated on: May 01, 2023 | 10:17 PM

Anisha Padukone Pics: अभिनेत्री दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथून त्याने त्याचे काही अप्रतिम फोटो शेअर केले आहेत.

Deepika Padukone : बहिणीच्या सौंदर्यापुढे दीपिकाचा ग्लॅमर फेल, हे फोटो तुम्ही पाहिलेत का?
Follow us on

मुंबई : दीपिका पदुकोन ही बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या बोल्ड अंदाज आणि फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. पण आता दीपिका नाही तर तिची बहीण चर्चेत आहे. तिच्या बहिणीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांपुढे दीपिकाच नाहीतर बॉलिवुडच्या अव्वल अभिनेत्रीही फेल ठरल्या आहेत.

सध्या दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोण मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.  यावेळी तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनिशाच्या सौंदर्यापुढे दीपिकाचाही ग्लॅमर फेल ठरला आहे.

 

अनिशा पदुकोण मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तसंच ती तिचे सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. आजही अनिशाने तिचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘माय हॅप्पी प्लेस’ असं कॅप्शन दिलं आहे.

 

 

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत अनिशा पदुकोण समुद्रात दिसत आहे. तसंच ब्लॅक कलरचा चष्मा घालत अनिशा फोटोत खास पोज देताना दिसत आहे. यावेळी ती ब्लॅक अँड व्हाइट स्विमसूटमध्ये दिसत आहे. ज्यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

अनिशा पदुकोण एक प्रोफेशनल गोल्फर आहे.  तसंच ती दीपिका पदुकोणच्या द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशनची सीईओ देखील आहे. अनिशाचे इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनिशानं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

दीपिकासोबत अनिशानं ऑस्करला लावली होती हजेरी

गेल्या महिन्यात दीपिका अमेरिकेत ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी झाली होती. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकासोबत अनिशा पदुकोणही सहभागी झाली होती. अनिशानं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात ती ऑस्कर पुरस्काराच्या पुतळ्यासोबत दिसत आहे.