मुंबई : ईदच्या निमित्ताने नुकताच सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) रिलीज झाला आहे. कोरोनाच्या कहरामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलमान खानचा चित्रपट सध्या काही ओटीटी प्लॅटफॉर्मसह काही थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होताच पायरेसीला बळी पडला आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आता कडक निर्णय घेतला आहे (Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app numbers).
व्हिडीओ शेअर करुन सलमान खानने आपल्या चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्यास सांगितले. यानंतरही एका फेसबुक वापरकर्त्याने हा चित्रपट बेकायदेशीरपणे डाऊनलोड केला आणि त्याचे पायरेटेड व्हर्जन व्हॉट्सअॅपवर 50 रुपयांना विकले. त्याच वेळी ‘झी’ने दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली.
बातमीनुसार, सलमानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे’च्या पायरसी प्रकरणात आता हायकार्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला बेकायदेशीरपणे प्रसारित करण्यास बंदी घातली आहे. झीच्या वतीने असा आरोप केला गेला होता की, हा चित्रपट चोरीने डाऊनलोड करून आणि स्टोरकरुन मोठ्या प्रमाणात लोकांमधून प्रसारित केला जात आहे.
आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाने व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या बेकायदेशीररित्या प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर, ज्याद्वारे चित्रपटाच्या पायरसी कॉपी विकल्या जात होत्या, अशा व्हॉट्सअॅप क्रमांकांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तर, दूरसंचार कंपन्यांना अशा ग्राहकांविषयी खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरुन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करता येईल (Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app numbers).
अलीकडेच एक अशी बातमी आली होती की, अश्विनी राघव नावाच्या एका फेसबुक युजरने पोस्ट केले होते की, तो ‘राधे’ हा चित्रपट व्हॉट्सअॅपवर 50 रुपयांना विकत आहे. या बातमीनंतर सलमानच्या चाहत्यांनी कारवाईची मागणी केली. असे म्हटले जात आहे की, या मागची सत्यता तपासण्यासाठी झी वितरण पथकाने त्याच्याकडे चित्रपटाची मागणी केली, त्यानंतर त्याने 50 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रकरणी अश्विनीसह आणखी दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
सलमानचा चित्रपट ‘राधे’ने पहिल्याच दिवशी ओटीटीवर 100 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. ‘राधे’मध्ये सलमान खानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे.
(Delhi High Court takes strict action against Radhe film Piracy suspend whats app numbers)
हेही वाचा :
Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?
Video | डेस्क जॉबमध्ये अडकलाय मनोज बाजपेयी, ‘The Family man 2’च्या नव्या प्रोमोत दिसला अनोखा अंदाज!@BajpayeeManoj | #TheFamilyMan2 | @PrimeVideoIN | #Entertainment https://t.co/OdsRDQ7BWl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021