बॉलीवूड अभिनेते सलमान खान(Salaman khan), फरदीन खान आणि अनिल कपूर एकतत्रित असलेल्या ‘नो एन्ट्री’ (N0 entry)चित्रपटाने 2005 मध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन ऐकेल होते. या कॉमेडी चित्रपटाने बॉक्सऑफिसवर भरपूर कमाई केली होती. अन तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर बातमी आली की ‘नो एन्ट्री’चा सिक्वेल बनणार आहे. तेव्हापासून चाहते . या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अनिल कपूर(Anil Kapoor) आणि सलमान खान दिसणार आहेत, पण हा चित्रपट चित्रपटगृहात कधी येणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे, हे जाणून घेतल्यानंतर चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. नो एंट्रीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दिग्दर्शक अनीस बज्मीने ‘नो एंट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. अनीस बज्मीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होऊ शकते. नो एंट्रीची कथा जिथून संपली तिथूनच चित्रपटाची कथा सुरू होणार असल्याचे तो सांगतो. या सिक्वलमध्ये सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. अनीस बज्मीनेही सिक्वेल इतक्या उशिरा बनवण्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले की अनेक वेळा कल्पना आल्या, त्यावर चर्चा झाली पण नंतर त्या नाकारल्या गेल्या. 2016 मध्ये पुन्हा एक कल्पना आली, ज्यावर आम्ही बोललो आणि चित्रपट करायचे ठरले.
नो एंट्री सिक्वेल मध्ये 10 अभिनेत्री दिसणार आहेत . त्यामुळेच चित्रपटाची कथा लिहिण्यास फार वेळा लागला असे अनीस बज्मी संगितले. नो एंट्रीच्या पहिल्या भागात बिपाशा बसू, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि ईशा देओल दिसलया होता. सिक्वलमध्येही या दिसून येतील असे म्हटले जात आहेत.