‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट

| Updated on: Feb 22, 2025 | 10:09 AM

सध्या सोशल मीडियावर युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, धनश्रीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती युजवेंद्रचे सिक्रेट सांगताना दिसत आहे.

तो बॅटिंग करत नव्हता तरीही..., धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
Dhanshree verma and Yuzvendra Chahal
Follow us on

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांची पहिली भेट कोविडमधील लॉकडाऊनच्या काळात झाली होती. या काळात काही करायला नसल्यामुळे युजवेंद्रने धनश्री वर्मा कडून डान्स शिकण्याचे ठरवले. डान्स शिकल्यानंतर 2 महिन्यांतच युजवेंद्रने धनश्रीला लग्नासाठी प्रपोज केले होते. ते पाहून धनश्रीला धक्काच बसला होता. धनश्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. तसेच धनश्रीने युजवेंद्रचे सीक्रेट सांगितले होते.

धनश्री वर्माने गेल्या वर्षी ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये युजवेंद्र चहलच्या लग्नाच्या प्रस्तावाबाबत मोकळेपणाने वक्तव्य केले होते. तिने उघड केले होते की 2 महिन्यांच्या नृत्य प्रशिक्षणानंतर युजवेंद्रने अचानक तिला प्रपोज केले. ते पाहून धनश्रीला धक्का बसला होता. धनश्री म्हणाली होती की, “लॉकडाऊन दरम्यान एकही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटपटू घरी बसून निराश होत होते.”

धनश्री वर्मा पुढे म्हणाली, “त्यादरम्यान, एके दिवशी युजींनी ठरवलं की त्यांना नृत्य शिकायचं आहे. युजींनी माझे व्हिडीओ आधी पाहिले होते. कदाचित सोशल मीडियावर. हे एक अतिशय व्यावसायिक विद्यार्थी-शिक्षकाचे नाते होते. मला हे अगदी स्पष्ट करायचे आहे. युजींनी माझ्याकडून २ महिने प्रशिक्षण घेतले. अचानक २ महिन्यांनी त्याने मला प्रपोज केले. तो बॅटिंगही करत नव्हता पण त्याने थेट षटकार मारला.”

हे सुद्धा वाचा

धनश्री वर्माने सांगितले की, युजवेंद्रने जे काही केले ते पाहून तिला धक्का बसला आणि तिने सर्वकाही आईला सांगितले. धनश्रीने खुलासा केला की तिची आई म्हणाली होती की, ‘गया तेरा स्टुडंट.’ मी खूप व्यावसायिक शिक्षिका होते. युजवेंद्र आणि धनश्री वर्मा यांचे डिसेंबर २०२० मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाले. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात.

युजवेंद्र चहलने घटस्फोटानंतर सोशल मीडियावर, “देवाने मला किती वेळा वाचवले ते मी मोजू शकत नाही. म्हणून मी फक्त त्या काळाची कल्पना करू शकतो, जेव्हा मला माहित नव्हते. मला माहीत नसतानाही नेहमी तिथे असण्याबद्दल देवाचे आभार मानतो” या आशयाची पोस्ट शेअर केली आहे.