क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा २० मार्च रोजी घटस्फोट झाला. लग्नाच्या जवळपास ४ वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये मतभेद सुरु असल्याचे म्हटले जात होते. काल अखेर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी धनश्रीचा नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे. हा अल्बम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
धनश्रीच्या या अल्बचे नाव ‘देखा जी देखा मैने’ असे आहे. या अल्बमची निर्मिती टी-सीरिजने केली असून ज्योती नुरन यांनी गायले आहे. तसेच जानी यांनी गाण्याला संगीत दिले आहे. जानी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोलही अतिशय धारदार आहेत. ‘देखा जी देखा मैं, अपना का रोना देखा. गैरों के बिस्तर पे, अपनो का सोना देखा’ असे या अल्बमचे बोल आहेत. गाण्यात आणखी एक ओळ आहे, “दिल तेरा बच्चा है, निभाना भूल जाता है. नया खिलौना देख के, पुराना भूल जाता है.” एकंदरीतच धनश्रीचे हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे.
वाचा: मेगास्टार महेश बाबूचे स्टार अभिनेत्रीशी अफेअर, गुपचूप मुंबईत भेटताना पत्नीने रंगेहाथ पकडलं?
‘देखा जी देखा मैने’ हे धनश्रीचे गाणे राजस्थानमध्ये शूट करण्यात आले आगे. या गण्यात धनश्रीसोबत’पाताल लोक’ सीरिजमधील अभिनेता इश्वाक सिंग दिसत आहे. गाण्यात, हे दोघे एका राजेशाही जोडप्याच्या भूमिकेत आहेत. एका दृश्यात, पती आपल्या पत्नीला मित्रासमोर थप्पड मारतो आणि दुसऱ्या दृश्यात, तो तिच्यासमोर एका महिलेशी जवळीक साधतो. त्यामुळे हे गाणे पाहून नेटकरी चकीत धाले आहेत.
अल्बम शेअर करण्यापूर्वी धनश्रीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात तिने म्हटले होते की, ‘मी आतापर्यंत केल्याल्या कामांपैकी सर्वाधिक भावनिक असलेला हा एकमेक अल्बम आहे. प्रत्येक कलाकाराला नेहमीच अशी भूमिका साकारताना त्यांची क्षमता दाखवायची असते. या भूमिकेला अभिनयाच्या बाबतीत एका विशिष्ट पातळीची तीव्रता हवी होती. टी-सीरीज टीमसोबत शूट करणे आनंददायी आहे आणि प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मला आशा आहे की ते प्रेक्षकांनाही तितकेच आवडेल.’