Marathi News Entertainment Dhanush rowdy baby crosses one billion views on youtube becomes most watched south indian song trends on twitter
‘कोलावेरी डी’नंतर धनुषच्या आणखी एका गाण्याचा यूट्युबवर धुमाकूळ, 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार
तमिळ चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता धनुषचा जलवा सध्या पाहायला मिळत आहे. तुम्हाला वाटेल, धनुषचा आत्ता कोणताही चित्रपट, गाणं किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही, मग अचानक त्याची चर्चा का होत आहे.
धनुषच्या ट्विटनंतर ट्विटरवर #Rowdybaby, #RowdyBabyHits1BillionViews हे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड करु लागले आहेत.
Follow us on
तमिळ चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता धनुषचा जलवा सध्या पाहायला मिळत आहे. तुम्हाला वाटेल, धनुषचा आत्ता कोणताही चित्रपट, गाणं किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही, मग अचानक त्याची चर्चा का होत आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर धनुषच्या एका ट्विटमध्ये लपलं आहे. धनुषचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होतंय. कोलावेरी डी या गाण्याच्या तुफान यशानंतर धनुष पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.
‘कोलावेरी डी’नंतर धनुषचं आणखी एक गाणं सध्या युट्यूबवर हिट ठरलं आहे. राउडी बेबी (rowdy baby) असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं धनुषचा सुपरहिट चित्रपट मारी 2 (Maari 2) या चित्रपटातलं आहे.
या गाण्याने नुकताच युटूयबवर 100 कोटी (1 बिलियन) व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. असं म्हटलं जातंय की, दाक्षिणात्य भाषांमधलं हे पहिलंच गाणं आहे, ज्या गाण्याने 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
धनुषने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ज्या दिवशी ‘राउडी बेबी’ गाण्याने 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला त्याच दिवशी ‘कोलावेरी डी’ या गाण्याला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.
धनुषच्या ट्विटनंतर ट्विटरवर #Rowdybaby, #RowdyBabyHits1BillionViews हे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड करु लागले आहेत.