Dia Mirza | दिया मिर्झाच्या सावत्र मुलीने फोटोग्राफर्सना पाहून का लपवला चेहरा ? अभिनेत्री म्हणाली, तिला घाबरवू..

| Updated on: Aug 05, 2023 | 10:53 AM

दिया मिर्झाने फोटोग्राफर्सना तिच्या मुलीचे फोटो काढण्याबद्दल नक्की काय सांगितलं ? काय म्हणाली अभिनेत्री ?

Dia Mirza | दिया मिर्झाच्या सावत्र मुलीने फोटोग्राफर्सना पाहून का लपवला चेहरा ? अभिनेत्री म्हणाली, तिला घाबरवू..
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) नुकतीच तिची मुलगी समायरा हिच्यासोबत मुंबईत स्पॉट झाली. फोटोग्राफर्स बाहेर दियाची वाट बघत उभे होते आणि ती येताच फोटो क्लिक करू लागले. तेव्हा दियासोबत तिची सावत्र मुलगी समायराही (Dia Mirza step daughter) उपस्थित होती, मात्र फोटोग्राफर्सना पाहून ती चेहरा लपवू लागली.

हे लक्षात येताच दियाने फोटोग्राफर्सना तिचे फोटो न काढण्याची विनंती केली. माझ्या मुलीला फोटो काढायाला आवडत नाहीत, तिला घाबरवू नका, असे दियाने फोटोग्राफर्सना सांगितले.

दियाच्या या विनंतीनंतर फोटोग्राफर्सनी ओके म्हणत तिचे फोटो काढणं बंद केल. त्यानंतर दियाची लेक, समायरा कारमध्ये जाऊन बसली आणि मगच दियाने फोटोग्राफर्ससाठी पोझ दिली.

समायरा रेखी ही दिया मिर्झाचा पती वैभव व त्याची पहिली पत्नी यांची मुलगी आहे. दीया व वैभव यांन अव्यान आझाद रेखी नावाचा एक गोंडस मुलगाही आहे.

2001 साली आलेल्या ‘रहना है तेरे दिल मे’ चित्रपटातून दिया मिर्झाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटानंतर दिया नॅशनल क्रश बनली होती. अभिनेता आर. माधवन या चित्रपटात दियासोबत मुख्य भूमिकेत होता, दोघांचीही जोडी लोकांना खूपच आवडली होती. आजही या चित्रपटाची गाणी आवडीने पुन्हा-पुन्हा ऐकली जातात.