1993 मध्ये दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांचा ‘आदमी खिलौना है’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी ओम प्रकाश यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया हिला या चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून निवड केली होती. डिंपल यांनी चित्रपटासाठी त्यांना होकारही दिला होता. पण, डिंपल हिच्या हाय डिमांडमुळे दिग्दर्शकाला विचार करायला भाग पाडले. अखेर, तो चित्रपट तिच्याकडून काढून घेण्यात आला. जितेंद्र, गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्री अशी बडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट त्या अभिनेत्रीसाठी कमबॅक करणारा ठरला. ती अभिनेत्री त्यावेळी नुकतीच पतीला घटस्फोट देऊन भारतात परतली होती. ती अभिनेत्री होती रीना रॉय…
अभिनेत्री रीना रॉय या त्यावेळी पाकिस्तानातून नुकतीच पती पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान याला घटस्फोट देऊन भारतात परतली होती. सिनेमात पुन्हा कमबॅक करण्यासाठी ती धडपडत होती. रीना रॉय आणि जितेंद्र या जोडीला लोकांची पसंतीही मिळाली होती. याचवेळी दिग्दर्शक जे. ओम प्रकाश हे ‘आदमी खिलौना है’ या सिनेमासाठी मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध घेत होते.
दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांनी या चित्रपटासाठी अभिनेत्री डिंपल कपाडिया हिचे नाव निश्चित केल होते. परंतु, डिंपल कपाडिया हिने त्यांच्याकडे अनेक हाय डिमांड केल्या. तिचे ते नखरे पाहून त्यांनी तिला चित्रपटामधून बाहेर केले. पाकिस्तानमधून भारतात परतलेल्या रीना यांच्याशी त्यांनी संपर्क केला. याआधी रीना रॉय-जितेंद्र या जोडीला घेऊन त्यांनी ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’ असे सुपरहिट चित्रपट दिले होते. पण, रीना रॉय यांनी त्यांना विचार करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली.
पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान याच्याशी लग्न केल्यानंतर त्या पाकिस्तानला गेल्या. कौटुंबिक जीवनात त्या व्यस्त झाल्या. मात्र, मोहसिन खान याला घटस्फोट देऊन त्या भारतात परतल्या तेव्हा त्यांचे वजन खूप खूप वाढले होते. अशा स्थितीत त्यांना काम करणे अवघड झाले होते. दुसरीकडे रीना रॉय यांना पुन्हा संधी देऊन त्यांचे करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक जे. ओम प्रकाश करत होते. अखेर त्यांनी जितेंद्र यांच्यामार्फत रीना रॉय यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
‘आदमी खिलोना है’ या सिनेमामधून रीना रॉय यांनी पुन्हा एकदा कमबॅक केले. हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा तुफान चालला. चित्रपटामध्ये जितेंद्रची पत्नी, गोविंदाची वहिनी आणि मीनाक्षी शेषाद्रीची जाऊ म्हणून भूमिका साकारली. गोविंदाचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट ज्यामध्ये त्याने जितेंद्र याच्या भावाची भूमिका केली होती. दुसरीकडे, जितेंद्रसोबत रीना यांचा हा शेवटचा चित्रपट होता ज्यामध्ये त्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या.