नवा दिल्लीः रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) बहुचर्चित जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) चित्रपटातील काही दृश्ये हटविण्यासाठ जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणावरुन आज दिल्ली उच्च न्यायालयाने जयेशभाई जोरदार चित्रपटाच्या निर्मात्यांना गर्भ लिंग निर्धारणाच्या (prenatal sex-determination test) प्रथेच्या बेकायदेशीर असलेल्या संबंधित काही दृश्यांमध्ये अस्वीकरण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल जी जनहित याचिका दाखल करणयात आली होती, त्याबद्दल न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्या खंडपीठाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजूरी देण्यात आली आहे. हा चित्रपट 13 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
IT’S HERE! #JayeshbhaiJordaar trailer is OUT ~ https://t.co/WNhLAt0xdr
Celebrate #JayeshbhaiJordaar with #YRF50 only at a big screen near you on 13th May! #ShaliniPandey | @bomanirani | #RatnaPathakShah | #ManeeshSharma | @divyangrt | @yrf | #JayeshbhaiJordaar13thMay pic.twitter.com/snCSYhXCRz
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 19, 2022
जयेशभाई जोरदार या चित्रपटाविषयी जनहित याचिका दाखल केल्यानंतर या चित्रपटातील काही दृश्ये सुनावणीदरम्यान पाहिली गेली. त्यावेळी खंडपीठाकडून चित्रपटातील संदेशाचे कौतुक केले मात्र त्यावेळी हे ही सांगण्यात आले की, चित्रपटातील जो संदेश सांगायचा आहे तो कौतुकास्पदच आहे मात्र त्या गर्भ लिंग निर्धारणाबद्दल चित्रपटातून लोकांना सांगावे लागेल की, गर्भ लिंग निदान करणे हा गुन्हा आहे.
चित्रपट निर्मात्यांनी दोन्ही वेळी डिस्क्लेमर दाखवला जाईल याचीही खात्री करावी असेही खंडपीठाकडून सांगण्यात आले आहे.
ज्येष्ठ वकील जयंत मेहता यांनी चित्रपट निर्मात्यांच्यावतीने चित्रपट कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही आणि डिस्क्लेमर संबंधित दृश्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदीमध्ये ठळकपणे दाखवले जाईल असेही सांगण्यात आले.
यावर खंडपीठाने चित्रपट निर्मात्यांना यूट्यूबसह इतर फॉरमॅटमध्ये डिस्क्लेमर जोडण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली. केंद्र सरकारकडून वकील अनुराग अहलुवालिया यांनी ट्रेलर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) द्वारे प्रमाणित आहे आणि चित्रपट निर्मात्यांना डिसक्लेमर ठेवण्यास सांगितले होते.
युथ अगेन्स्ट क्राईम या याचिकाकर्त्यातर्फे वकील पवन प्रकाश पाठक यांनी याबद्दल युक्तिवाद केला की हा चित्रपट अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा लिंग निर्धारणाचे साधन म्हणून प्रचार करत नाही तर कारण ती गोष्ट कायद्यानुसार बेकायदेशीरच आहे.
या याचिकेत ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटातील अल्ट्रासाऊंड क्लिनिक सेंटर सीन सेन्सॉर/डिलीट करण्यासाठी केंद्र आणि जनहित याचिकाकर्त्यांकडून योग्य निर्देश देण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये लिंगनिदान केले जात आहे, आणि त्यामध्ये मुलीचा मुलीचा गर्भपात केला जात आहे. या जनहित याचिकेत असं म्हटले आहे की, प्री-कन्सेप्शन आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक तंत्र कायद्याचे उल्लंघन आहे. 13 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होत असल्याने न्यायालयाकडून जनहितयाचिकेतील विनंती रिलीजपूर्वी मंजूर करण्याची केली आहे.
या ट्रेलमधील अगर लडका हुआ तो जय श्री कृष्ण आणि लडकी हुए तो जय माता दी असं म्हणून नंतर मुलीचा गर्भपात झाला असं दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आज याबाबतची सर्व कागदपत्र जमा करुन याविषयीही उद्या निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे.
जयेशभाई जोरदार हा दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा आणि मनीश शर्मा निर्मित आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात रणवीर सिंग एका पारंपरिक गुजराती सरपंचाचा मुलगा आहे जो या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तो समाजात स्त्री-पुरुषांच्या समानतेच्या हक्कांवर विश्वास ठेवणारा आहे. हा चित्रपट 13 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.