अभिनेत्री रेखाचं नावे अनेक कलाकारांबरोबर जोडली गेली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं अफेअर खूप चर्चेत आलं. पण एकीकडे रेखा आणि संजय दत्त यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या.
बॉलीवूडमध्ये कोणाचं नाव कोणाशी कशापद्धतीने जोडलं जाईल आणि कोणाचं ब्रेकअप, अफेअर्सच्या बातम्या समोर येतील काही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींबद्दल काहीना काही चर्चा सुरु असतात.
हे अगदी 80s -90s च्या काळापासून आहे. कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा होणे हे सामान्य बाब झाली आहे. असे अनेक गॉसिप गाजले आहेत. अशीच चर्चा एका जोडीबद्दलही प्रचंड प्रमाणात झाली होती.
संजय दत्त आणि अभिनेत्री रेखा यांच्या अफेअर्सच्या चर्चा
अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रेखा या जोडीच्या अफेअर्सच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअर्सच्या चर्चांना बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या त्यावेळी सामान्य बाब झाली होती. एवढच नाही तर दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात होतं. नंतर या चर्चा आणि हे प्रकरण इतकं चिघळलं की अखेर संजय दत्तच्या वडिलांना यात पडावं लागलं होतं.
संजय दत्तची कारकीर्द चित्रपटाच्या रेकॉर्डपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. जेलपासून ते ड्रग्जपर्यंत तसेच अफेअर्सच्याबाबतीतही अशा अनेक घटना आहेत ज्यांच्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. रेखाच्याबाबतीतही तेच झालं अमिताभ बच्चनपासून अक्षय कुमारपर्यंत सर्वांशी त्यांचं नाव जोडलं गेलं. रेखाचे नाव संजय दत्तसोबतही जोडले गेलं होतं.
या चर्चांमुळे सुनील दत्त नाराज झाले होते
संजय दत्त आणि रेखा यांनी पहिल्यांदा 1984 मध्ये ‘जमीन आसमान’ या चित्रपटात काम केले होते. या चर्चा चित्रपटानंतरच दिसू लागल्या. दोघांनी एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याची अफवा पसरली होती. या अफवांमुळे संजय दत्तचे वडील सुनील दत्तही खूप नाराज झाले होते आणि त्यांनी आपल्या मुलाला कठोर शब्दात समज दिली होती असंही म्हटलं जातं.
‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाचे लेखकांनी सांगितलं सत्य
‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाचे लेखक यासिर उस्मान यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली. यासिर उस्मानने एका मुलाखतीत रेखा आणि संजय दत्तच्या गुप्त लग्नाच्या चर्चांना त्यांनी पूर्णपणे नकार दिला. या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. जमीन आसमान या चित्रपटानंतर या दोघांबाबत विविध प्रकारच्या बातम्या येत होत्या. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने या अफवांचे खंडनही केले होते. अफवांना कंटाळून सुनील दत्त यांना अखेर या प्रकरणात उडी घ्यावी लागली होती. तर त्यानंतर रेखानेही या अफवांना उत्तर देणे कधीही आवश्यक मानले नाही. असं उस्मान यांनी म्हटलं.
लग्नात सिंधूर लावून का पोहोचली होती रेखा?
1980 साली अभिनेता ऋषी कपूरच्या लग्नात रेखाला निमंत्रण होतं. या लग्नात रेखा सिंधूर लावून पोहोचली होती. रेखाने कोणाच्या नावाचे सिंधूर लावले असा प्रश्न सर्वांना पडला होता. सगळ्यांच्या नजरा अमिताभ बच्चन यांच्यावर खिळल्या होत्या. तर काहींनी संजय दत्त याचं नावाची चर्चा केली होती. पण काही दिवसांनी रेखाने यावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली, “माझ्याबद्दल ज्या विविध गोष्टी बोलल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मी शूटिंगवरून थेट लग्नाला पोहोचलो आणि मी माझा गेटअप बदलला नाही. याच कारणामुळे मला केसांना लावलेला सिंदूरही काढता आला नाही.” असं स्पष्टीकरण तिने दिलं होतं.