90 च्या चित्रपटांचा विषय निघाला की एक नाव सर्वांच्याच तोंडात येत ते म्हणजे दिव्या भारती. या अभिनेत्रीने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तसेच तिची फॅन फॉलोईंगही जबरदस्त होती. पण त्याच पद्धतीने तिने फार कमी वयात जगाचा निरोपही घेतला. जो नक्कीच सर्वांच्या जीवाल चटका लावणारा होता. पण तिच्या आठवणी मात्र आजही निघतात.
अनेकांना तिच्याबद्दलचे भास व्हायचे
तिच्या निधनानंतरही अनेकांना तिच्याबद्दलचे भास व्हायचे. असाच एक प्रसंग सांगितला आहे तिच्या जवळच्या मैत्रिणीने, ती म्हणजे आयशा जुल्का. आयशाने एका मुलाखतीत दिव्या भारती बद्दल अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले. आयशा जुल्कानं ‘रंग’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगचा एक किस्सा सांगितला. जो जाणून कदाचितच कोणाचा विश्वास बसेल. आयशाने सांगितले की दिव्या भारती आजूबाजूला असल्याचं तिला कायम जाणवायचं. तिने असे काही पाहिले की तिला वाटलं की दिव्या भारती इथेच आहे.
आयशा जुल्का आणि दिव्या भारतीची बॉडिंग
आयशा जुल्काशिवाय दिव्या भारतीही ‘रंग’मध्ये होती. दोघींचे खूप चांगले बॉडिंग होते. दिव्या भारतीने या चित्रपटात आयशा जुल्काच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आयशाने या मुलाखतीत सांगितलं की, दिव्या जेव्हा होती तेव्हा ती ‘वक्त हमारा है’च्या सेटवर रोज यायची. कधी ती मॅचिंग शूज आणायची, कधी आणखी काही. एके दिवशी जेव्हा दिव्या भारतीने पाहिले की आयशाने टिकली लावली नाही, तेव्हा तिने मेकअप रूममध्ये जाऊन टिकली आणली आणि तिला लावली, ती इतकी प्रेमळ होती.
दिव्या भारती असल्याचा झाला अभिनेत्रीला भास
आयशा जुल्काने सांगितलं की, जेव्हा ती ‘रंग’साठी डब करत होती तेव्हा ती दिव्या भारतीसोबतचा सीन डब करू शकली नाही. ती रडायला लागली आणि मोठ्याने ओरडू लागली. यामुळे डबिंग पुढे ढकलावं लागलं. नंतर, ‘रंग’च्या प्रीमियरदरम्यान, जेव्हा दिव्या भारतीचा सीन आला तेव्हा अचानक स्क्रीन पडली. हे पाहून आयशा जुल्का हादरून गेली. अभिनेत्रीने सांगितले की ती बराच काळ शांतपणे झोपू शकली नव्हती ‘रंग’ 1993 साली रिलीज झाला होता आणि तो तलत जानी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट पूर्ण झाला, पण रिलीज होण्यापूर्वीच दिव्या भारतीचं निधन झालं होतं.
दिव्या भारतीने जगाचा घेतला निरोप
दिव्या भारतीचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले. त्या वेळी ती 19 वर्षांची होती. ती त्यांच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडली होती आणि जेव्हा ती पडली तेव्हा ती दारूच्या नशेत होती, असं सांगण्यात येतं. पण आजही दिव्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. दिव्याच्या आकस्मिक निधनामुळे तिचे अनेक चित्रपट अपूर्ण राहिले. काही चित्रपट तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित करण्यात आले, तर काही सिनेमात इतर अभिनेत्रींना कास्ट करुन पुन्हा शूट करावे लागले.