KBC15 : अमिताभ बच्चन यांचा 1 कोटी रुपयांचा ‘तो’ प्रश्न, ब्रिटिश मिलिटरी संबंधित त्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का?

| Updated on: Dec 30, 2023 | 10:00 PM

कौन बनेगा करोडपती 15 च्या सेटवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान सांगितले की केबीसीच्या इतिहासातील हा असा पहिला भाग आहे. ज्यामध्ये स्पर्धकाने पहिल्याच दिवशी एक कोटीचा प्रश्न गाठला होता.

KBC15 : अमिताभ बच्चन यांचा 1 कोटी रुपयांचा तो प्रश्न, ब्रिटिश मिलिटरी संबंधित त्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का?
amitabh bacchan in kbc15
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : कौन बनेगा करोडपती या शोचा प्रत्येक सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. केबीसीचा 15 वा सीझनही चांगला गाजला. अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती शो चा शेवटचा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात हा शो संपण्यापूर्वी बिग बी खूप भावूक झाले होते. चाहतेही उदास दिसत होते. अशा परिस्थितीत कौन बनेगा करोडपतीचा शेवटचा भाग खूपच मनोरंजक होता. केबीसीच्या शेवटच्या आठवड्यात अमिताभ बच्चन यांच्यासमोर बिहारचे अविनाश भारती हॉट सीटवर बसले होते. अविनाशचा उत्कृष्ट खेळत होते. पण, एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही? तो प्रश्न काय होता आणि त्याचे उत्तर काय होते हे जाणून घेऊ.

आईला दिलेले वचन पूर्ण केले

बिहारचा अविनाश हा जेव्हा बिग बी यांच्यासमोर हॉट सीटवर बसला तेव्हा तो खूप भावूक झाला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा त्याने बिग बींसमोर केला. 2019 मध्ये त्याने आपले घर सोडले होते. घर सोडताना त्याने आईला वचन दिले होते की एक तर तो आयएएस अधिकारी म्हणून समोर येईल किंवा केबीसीमध्ये खेळला तरच घरी परत येईल. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. आईला दिलेले वचन पूर्ण होत आहे याचा आनंद होतोय असे त्याने सांगितले.

एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देताना…

अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान अविनाश याला नेक प्रश्न विचारले. त्याची त्याने बरोबर उत्तरे दिली. त्याच्याजवळ असलेल्या तिन्ही लाईफलाईनचा वापर करून त्याने 50 लाख रुपये जिंकले. मात्र, पुढे खरी कसोटी होती. बिग बी यांनी त्याला 1 कोटींसाठी प्रश्न विचारला. मात्र, त्यापूर्वी त्यांनी एक गोष्ट नमूद केली ती अशी की, केबीसीच्या इतिहासातील हा पहिला भाग असा आहे ज्यामध्ये स्पर्धकाने पहिल्याच दिवशी 1 कोटी रुपयांचा प्रश्न गाठला. यानंतर त्यांनी अविनाशला 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारला.

अविनाश या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खूप प्रयत्न करता होता. त्याच्याकडे कोणतीही लाईफलाइन उरली नव्हती. त्यामुळे त्याने 50 लाख रुपयांच्या प्रश्नासह गेम अर्ध्यावर सोडला. अविनाश याच्यासाठी एक कोटी रुपयांसाठी पुढील प्रश्न होता. हा प्रश्न असा की, ‘यापैकी 15 वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा कोण होता ज्याला व्हिक्टोरिया क्लास म्हणजेच सर्वोच्च ब्रिटिश लष्करी सन्मानाचा सर्वात तरुण मानकरी मानला जातो? यासाठी अविनाश याच्यासमोर खालील चार पर्याय होते.

1 कोटी प्रश्नाच्या उत्तरासाठी असलेले चार पर्याय

A – अँड्र्यू फिट्जगिबन

B – फ्रान्सिस फिट्झपॅट्रिक

C – रिचर्ड फिट्झगेराल्ड

D – चार्ल्स

या चार पर्यायांपैकी पर्याय A म्हणजे अँड्र्यू फिट्जगिबन हे बरोबर उत्तर आहे हे अविनाश याला सांगता आले नाही.