हा तर सुपरफ्लॉप… आयुष्मान खुराणाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ बद्दल असं का म्हणाला हा अभिनेता ?

| Updated on: Aug 29, 2023 | 4:44 PM

अभिनेता आयुष्मान खुराणाचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अनन्या पांडे हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र असे असतानाही एका अभिनेत्याने मात्र या चित्रपटाला नाव ठेवत त्याच्या कलेक्शनबद्दलही मोठा खुलासा केला आहे.

हा तर सुपरफ्लॉप... आयुष्मान खुराणाच्या ड्रीम गर्ल 2 बद्दल असं का म्हणाला हा अभिनेता ?
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khuarrana) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. प्रदर्शनापासूनच हा चित्रपट बऱ्याच चर्चेत आहे. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अनेक चाहते हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट बघत होते. या चित्रपटाने रिलीज होताच सनी देओलच्या ‘गदर- 2’ ला मोठी टक्कर दिली आहे. 25 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांमध्ये 46.13 कोटींचा गल्ला कमावला आहे.

याचदरम्यान बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म क्रिटीक के.आर.के अर्थात कमाल राशिद खान याने एक ट्विट करत हा चित्रपट फ्लॉप असून त्याचे बॉक्स ऑफीस कलेक्शनही फेक म्हणजेच खोटं असल्याचं सांगितलं आहे. त्याव्यतिरिक्त त्याने चित्रपटाबद्दल अनेक दावे केले आहेत.

केआरकेने सांगितले ‘ड्रीम गर्ल 2’चे कलेक्शन

कमाल राशिद खान याने नुकतेच ट्विट केले आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ चे संपूर्ण भारतातील बिझनेस, पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये २ कोटी रुपये आहे. संपूर्ण भारतात सुमारे ४ कोटींचा बिझनेस केला आहे. चार दिवसांतील चित्रपटाचे कलेक्श ४१.२५ कोटी रुपये आहे. हा (चित्रपट) तर सुपरफ्लॉप झाला.

 

 

त्यासह के.आर.के याने आणखी एक ट्विट केले असून ड्रीम गर्ल २ फ्लॉप झाल्यावर एकता कपूरने कलेक्शनचे खोटे आकडे पसरवले आहेत, असेही त्याने लिहीले आहे. सोमवारचे एकूण कलेक्शन ४ कोटी आहे, तिने त्यात १.६० कोटी वाढवल्याचे त्याचे म्हणणे आहे.

 

 

केआरके याने या चित्रपटाबद्दल अजूनही बरंच काही लिहीत हा चित्रपट फ्लॉप ठरल्याचे म्हटले आहे.