मुंबई : मुंबई: राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीने आता बॉलिवूडलाही दणका दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात जॅकलीनची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जॅकलीनचं फिक्स्ड डिपॉझिट जप्त केलं आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं जातं. यांचं नातं मैत्रीच्या पुढे असल्याचीही चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचंही समोर आलं आहे. शिवाय जॅकलिनच्या भावाला 15 लाख रुपये दिल्याचीही माहिती आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जॅकलिनची 7 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या दोघांची मैत्री मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. सुकेशने जॅकलिनला महागडी गिफ्ट्स दिली होती यात चार मांजर, घोडा घड्याळं यांचा समावेश आहे. ज्यामध्ये 9 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 52 लाख किमतीची पर्शियन कार होती. यात बिर्किनी बॅग, चॅनेल, गुची, YSLचे कपडे, हर्मीस-टीफिनी ब्रेसलेट, महागड्या अंगठ्या आणि कानातले यांचा समावेश होता. इतकंच नाही तर, रोलेक्स, फ्रँक मूलरची घड्याळं यांनीही तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला गेला. नवी कोरी मिनी कूपर देऊन तिला आणखी भुरळ पाडण्यात आली. केवळ जॅकलिन फर्नांडीसच नाहीतर, तिच्या परिवाराचीही बडदास्त ठेवण्यात आली. यात तिच्या कुटुंबातील सदस्यांना पोर्श आणि मासेराती कार भेट म्हणून मिळाल्या. तिच्या बहिणीला अमेरिकेत 1 लाख 80 हजार डॉलरची मदत केली गेली. तर, ऑस्ट्रेलियातील भावाला 50 हजार डॉलर दिले गेले. जॅकलिनला मांजरी आवडतात कळल्यावर तिला चक्क चार महागड्या मांजरी दिल्या गेल्या.
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुमधला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याचं अमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक केली. त्याने 75 जणांचे 100 कोटी लाटल्याचा आरोप आहे. त्याला वयाच्या 17 व्या वर्षी अटक झाली होती. करूणानिधी, कुमारस्वामी, जय ललिता या सारख्या नेत्यांच्या नावाचा वापर करत त्याने अनेकांना लुटलं.