“तुला काय वाटतं …” प्रत्येक किसनंतर इम्रान हाश्मीने विद्या बालनला एकच प्रश्न विचारून हैराण केलं होतं

| Updated on: Jan 15, 2025 | 3:58 PM

इम्रान हाशमीचे किसिंग सीन्स नेहमीच चर्चेत असतात. पण विद्या बालनसोबतच्या एका चित्रपटात इम्रानने प्रत्येक किसींग सीननंतर विद्याला एकच प्रश्न वारंवार विचारून भंडावून सोडलं होतं. या प्रश्नामुळे विद्याही विचारात पडली होती. विद्या बालनने स्वत: याचा खुलासा केला आहे.

तुला काय वाटतं ... प्रत्येक किसनंतर इम्रान हाश्मीने विद्या बालनला एकच प्रश्न विचारून हैराण केलं होतं
Follow us on

बॉलिवूडमध्ये किसींग सीन्स, बोल्ड सीन्स आता तसे नवे नाहीत. कोणत्याही चित्रपटात आता हे सिन्स असतातच असतात. पण त्यात इम्रान हाशमीचा चित्रपट म्हटल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावतात, कारण त्याच्या चित्रपटांची गाणी जशी फेमस होतात त्याहूनही जास्त त्याच्या चित्रपटातील त्याचे किसींग सिन्स जास्त चर्चेचा भाग होतात.

किसींग सीन्स म्हटलं की आधी त्याचचं नाव सर्वांच्या तोंडात येतं. एवढच काय तर अनेक मुलाखतींमध्ये इम्रानला या सीन्सवरून अनेक प्रश्न वचारण्यात आले आहेत. तसेच तो या सीन्ससाठी काही विशेष तयारी करतो का असंही कित्येक मुलाखतींमध्ये विचारण्यात आलं आहे.

किसींग सीन्सबद्दल इम्रानला पहिल्यांदाच चिंता वाटत होती

पण असा एक चित्रपट होता की त्यात त्याला त्याच्या अभिनेत्रीसोबत किसींग सीन्स करताना थोडी चिंता वाटत होती. ती अभिनेत्री होती विद्या बालन. याचा खुलासा स्वत: विद्या बालनने एका मुलाखती दरम्यान केला आहे. ‘ हमारी अधुरी कहाणी’ चित्रपटात इम्रानने विद्या बालनसोबत काम केलं आहे. त्यातही त्यांचे किसीग सीन्स होते. त्यानंतर त्यांचा ‘घनचक्कर’ हा चित्रपट आला.

अभिनेता इम्रान हाशमी चित्रपटात असेल, तर त्यात अनेक किसिंग सीन्स, बोल्ड दृश्य असतात असं म्हटलं जातं. इम्राननं आजवर केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये ते दिसूनही आलंय. बहुतांश वेळा साडी या पारंपरिक पोषाखात दिसून येणाऱ्या अभिनेत्री विद्या बालननंही इम्रान हाशमीसोबत काम केलंय.

किसिंग सीन्सवेळी विद्याच्या नवरा नाराज होण्याची चिंता होती

विशेष म्हणजे विद्यानं इम्रानसोबत काही किसिंग सीन्सही केले आहेत. त्या दोघांची या चित्रपटात दोघांचे अनेक कीसिंग सीनही आहेत. याच चित्रपटातील किसींग सीन्सवेळी इम्रानला चिंता वाटत होती. आणि त्याने प्रत्येक सीनच्या वेळी विद्याला एकच प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं.

विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या जोडी ‘घनचक्कर’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. वेगळ्या पठडीतल्या या सिनेमात दोघांचे अनेक किसींग सीन्सही होते. एका कार्यक्रमात विद्याने त्या किसींग सीन्सबद्दल काही मजेदार खुलासे केले आहेत. विद्याने सांगितले की, इम्रान प्रत्येक किसींग सीननंतर एक विचित्र प्रश्न विचारायचा.

प्रत्येक किसींग सीननंतर इम्रान सिद्धार्थबद्दल विचारायचा

प्रत्येक किसींग सीन झाल्यावर इम्रान विचारायचा की, “तुला काय वाटतं सिद्धार्थ(विद्याचा पती) हा किसींग पाहिल्यावर काय म्हणेल? तुला वाटतं का की, तो माझा पेमेंट चेक मला देईल?” विद्या म्हणाली की, ‘इम्रानला प्रत्येक किसींग सीननंतर केवळ सिद्धार्थची चिंता होती की, तो काय म्हणेल. मी नेहमी विचारात पडायचे की, तो मला असे प्रश्न का विचारतोय”

विद्याने सांगितल्याप्रमाणे इम्रानला विद्याच्या नवऱ्याची चिंता होती. किसींग सीन्समुळे तो नाराज तर होणार नाही ना, आणि त्याचा परिणाम त्याच्या पेमेंटवर झाला तर,अशा अनेक प्रश्न त्याच्या मनात होते आणि म्हणून कदाचित पहिल्यांदा इम्रानला किसींग सिन्समुळे चिंता वाटली असावी.