मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान (shah rukh khan) आज 58 वर्षांचा झाला आहे. त्याचे या वर्षी रिलीज झालेले ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी ताबडतोड कमाई करत अनेक विक्रम रचले आहेत. शाहरूख हा जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटसृष्टीमधील त्याच्या कारकिर्दीला जवळपास 35 वर्षं झाली असून ‘झिरो’ ते बॉलिवूडचा सर्वात यशस्वी ‘हिरो’ बनण्याचा प्रवास त्याने अथक मेहनतीने पूर्ण केला आहे. पण शाहरुख फक्त बॉलीवूडच्या चित्रपटांमधूनच कमाई करत नाही, तर त्याची कमाई अनेक वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे होते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
शाहरुख हा फक्त एक अभिनेताच नव्हे तर यशस्वी आणि उत्तम बिझनेसमनही आहे. अनेक स्टार्टअप्समध्येही त्याने गुंतवणूक केली आहे. आयपीएलच्या ‘कलकत्ता नाइट रायडर्स’ टीमचा तो को-ओनरही आहे. आणि ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ नावाचे त्याचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही आहे. याशिवाय तो अनेक सोर्सद्वारा बक्कळ कमाई करतो. त्याचं नेटवर्थ किती, तेही जाणून घेऊया.
शाहरुख खानचे नेटवर्थ
मुंबईतील बँडस्टँड भागात सुमारे 200 कोटी रुपयांच्या ‘मन्नत’ बंगल्यात राहणाऱ्या शाहरुख खानची एकूण संपत्ती 6300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. दुबईतील ‘पाम जुमेरा’मध्ये त्याचा तब्बल 100 कोटींचा बंगला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो. तो चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 280 ते 300 कोटींच्या घरात आहे.
शाहरुख खानचे इनकम सोर्स