मुंबई | 5 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते हे त्यांच्या अभियनामुळे तर कोणी गुड लूक्समुळे नावजले जातात. खूप लोकप्रियही होतात. मात्र 2000 साली अशा एका अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं जो गुड लूकिंग तर होताच, पण अभिनयतही निपुण होता. त्याचा पदार्पणातील चित्रपटच एवढा हिट ठरला की तो सुपरस्टार बनला आणि बॉलिवूडवर अधिराज्य गाजवू लागला.
त्या सुपरस्टारची सर्वत्र चर्चा होती. मुलींमध्ये तर त्याची क्रेझ प्रचंड होती. त्याचा पदार्पणातील चित्रपट पाहून मुली त्याच्यासाठी इतक्या वेडावल्या की बघता-बघता त्याच्याकडे लग्नाची बहुसंख्य प्रपोजल्स आली. त्या अभिनेत्याला फक्त 100-200 नव्हे तब्बल 30 हजार मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आणि याचा खुलासा खुद्द त्या अभिनेत्यानेच द कपिल शर्मा शो मध्ये केला होता.
व्हॅलेंटाइन्स डे ला मिळाली 30 हजार प्रपोजल्स
हा सुपरस्टार दुसार तिसरा कोणी नसून, तो आहे हृतिक रोशन. दीपिका पडूकोण सोबत आगामी ‘फायटर’ चित्रपटात झळकण्याासठई तो सज्ज झाला आहे. 2000 साली आलेल्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामध्ये त्याच्यासोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत झळकली. विशेष म्हणजे कहो ना प्यार है चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 80 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी हृतिकला सुमारे 30 हजार मुलींनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
असंख्य तरूणीच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हृतिकने त्या सर्व मुलींचं मनं मोडून, त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड सुझान खानसबोत लग्न केलं. दोघांना दोन मुलंही आहेत. पण 2014 साली हृतिक आणि सुझान वेगळे झाले. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्याने त्यांचे चाहते हादरलेच. सध्या सुझान ही अर्सलान गोनी आहे. तर हृतिक हा त्याच्यापेक्षा बीच लहान असलेली, अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत आहे.
फायटरमध्ये दीपिकासोबत झळकणार हृतिक
हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘फायटर’ चित्रपटात दीपिका पडूकोणसोबत झळकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनचे नेटवर्थ 3 हजार कोटी रुपये आहे. एक हुशार अभिनेता असण्यासोबतच तो एक अत्युत्तम डान्सरही आहे. आजही लाखो मुली त्याच्या फिटनेसच्या वेड्या आहेत. मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, हृतिक रोशनचे मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर एक आलिशान डुप्लेक्स आहे, ज्याची सध्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 10 कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान कार्सही आहेत.