बॉलिवूडमधील अनेक कपल्स प्रसिद्ध आहेत, काहींचं लग्न तर झालं तर काहीचं दुर्दैवाने ब्रेकअप. पण त्या सर्वांत चर्चेत असलेली एक जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलामन खान यांची. एकेकेळी त्यांच्या नात्याची खूप चर्चा होती. 1999 साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र काही काळाने, 2002 साली भांडण, बेबनाव यामुळे दोघांचही नात तुटलं, ज्याचीही प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर ऐश्वर्याचं नाव अनेकांशी जोडलं गेलं पण अखेर 2007 साली तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं, त्यांना आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. पण सलमान मात्र अजूनही अविवाहीत आहे.
ऐश्वयापूर्वी सलमानचं अनेकींशी नातं होतं, त्याच्या गर्लफ्रेंड्सपैकी एक म्हणजे सोमी अली. सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या सोमीने नुकत्याच एका मुलाखतीत ऐश्वर्या- समलानच्या नात्याबद्दल कधीच माहीत नसलेले किस्से शेअर केलेत.
ऐश्वर्या-सलमानचं नातं कसं झालं सुरू ?
1991 ते 1999 पर्यंत असा मोठा काळ अभिनेता सलमान खान हा सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झाले आणि त्यानंतर सलमान हा ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान सोमी अलीने ऐश्वर्या आणि सलमानचे नाते कसे फुलले याचा खुलासा केला. हम दिल दे चुके सनम चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आणि सोमी हिने सलमानला फोन केला होता, पण त्याने काही तिचा कॉल उचलला नाही.
सोमी पुढे म्हणाली, ‘ शूटिंह सुरू असताना मी सलमानला कॉल केला , पण त्याने फोन उचलला नाही. मग मी संजय लीला भन्साळी यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले की तो ( सलमान) आत्ता एका शॉटमध्ये ( शूटिंगमध्ये) बिझी आहे, म्हणून तो तुझ्याशी बोलू शकत नाही’, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना विचारलं की, ‘ की तो ( सलमान) जर शॉटमध्ये आहे, तर तू तो दिग्दर्शित का करत नाहीयेस ? तू माझा फोन कसा उचलतोयस ? माझा हा लॉजिकल प्रश्न ऐकल्यारवर काय बोलावं हे संजय भन्साळी याला समजलंच नाही’, असं सोमी म्हणाली.
सलमानच्या जिममध्ये ऐश्वर्याचा प्रवेश
याच मुलाखतीत सोमीने खुलासा केला की, गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान जिममध्ये ऐश्वर्या येऊ लागली होती. ते दोघेही ग्राऊंड फ्लोअरवर राहू लागले होते. जिममध्ये सलमान-ऐश्वर्याची लव्हस्टोरी सुरू झाली का ? असा प्रश्न विचारल्यावर सोमी म्हणाली, ‘नाही, हम दिल दे चुके सनमच्या शूटिंग दरम्यान सलमान-ऐश्वर्या प्रेमात पडले होते. माझी बाजू घेतली, त्या आतील नोकरांकडून मला ही माहिती मिळाली. त्यांच्या नात्यात काही घडतंय याची मला जाणीव झाली. या नात्यात आपल्याला खूप काळ राहता येणार नाही, हे त्यानंतर मला समजलं,’ असंही सोमीने नमूद केलं.
सलमानसोबत ब्रेकअप का केलं, ऐश्वर्याने सांगितलं होतं कारण
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय याविषयी कधीही बोलले नाही आणि तिने याकडे नेहमी दुर्लक्ष केले. मात्र, 2002 मध्ये एका मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबतच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते. सलमानच्या सर्वात वाईट काळात ती कशी त्याच्यासोबत उभी राहिली आणि त्या बदल्यात त्याच्याकडून आपल्याला कशी अपमानास्पद वागणूक मिळाली, हे तिने उघड केलं. कधी तिने कॉल उचलला नाही तर सलमानने तिला बराच त्रास दिला आणि स्वत:ला दुखापत करून घेण्याचाही प्रयत्न केल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. त्यामुळे कोणत्याही स्वाभिमानी महिलेप्रमाणेच मी ते नातं संपवण्याचा निर्णय घेतला, असंही ऐश्वर्याने नमूद केलं.