मुंबई : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच महिलांच्या कपड्यांबाबत विधान केले होते. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath singh rawat) म्हणाले की, फाटलेली जीन्स घालणे म्हणजे संस्कार नाहीत. या वक्तव्यानंतर या ते चांगलेच वादात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी टीकाही केली. दरम्यान, ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री चित्राशी रावतचे (Chitrashi Rawat) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तीने फाटलेली जीन्स परिधान केलेली दिसत आहे. शिवाय तिच्या या फोटोंसोबत असणाऱ्या पोस्टमध्ये चित्राशी ही मुख्यमंत्र्यांची कन्या असल्याचे वर्णन केले जात आहे (Fact Check chitrashi rawat ripped jeans photo goes viral on internet saying she is daughter of Tirath singh rawat).
यह तब है, जब इनकी बिटिया चित्रांशी रावत अभिनेत्री हैं। चक दे इंडिया की कोमल चौटाला।
चलिए देश को आख़िरकार एक ऐसा…
Posted by Rajesh Singh on Wednesday, 17 March 2021
चित्राशीचे हे फोटो शेअर करून लोक म्हणत आहेत की, ‘स्वतः तीरथ सिंह रावत यांची मुलगी एक अभिनेत्री आहे आणि ती स्वतः असे कपडे घालते. आणि हे इतर महिलांच्या कपड्यांवर ताशेरे ओढत आहेत’. मात्र, आता या प्रकारावर स्वत: चित्राशीने मौन सोडले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात चित्राशी म्हणाली की, ‘माझा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी फाटलेली जीन्स घातली आहे आणि त्यात मला उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची कन्या म्हटले जाते. माझ्या वडिलांचे नाव तीर्थ सिंह रावत आहे, हे खरे आहे. परंतु, केवळ त्यामुळे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कन्या म्हणून माझा फोटो व्हायरल करणे हे समजण्या पलीकडचे आहे.’ वास्तविक, चित्राशीच्या वडिलांचे नाव तीर्थ सिंह रावत आहे. केवळ, नाव सारखे असल्याने हा सर्व गोंधळ उडाला आहे (Fact Check chitrashi rawat ripped jeans photo goes viral on internet saying she is daughter of Tirath singh rawat).
रावत यांनी 17 मार्च रोजी देहरादून येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केलं. तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. “मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता”, असं रावत म्हणाले. “मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?”, असा सवाल त्यांनी केला होता.
(Fact Check chitrashi rawat ripped jeans photo goes viral on internet saying she is daughter of Tirath singh rawat)
फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? उर्मिला मातोंडकरांचं खोचक ट्विट
जीन्सप्रकरण भोवले, अखेर मुख्यमंत्री रावत यांची माफी; म्हणाले…