‘लोकं ऑक्सिजन विना मरतायत…तुम्ही काय करताय?’, नेटकऱ्याच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनने दिले उत्तर!

| Updated on: Apr 26, 2021 | 1:58 PM

‘ज्युनिअर बच्चन’ अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. सतत होणाऱ्या ट्रोलला देखील तो उत्तर देत ​​असतो.

‘लोकं ऑक्सिजन विना मरतायत...तुम्ही काय करताय?’, नेटकऱ्याच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनने दिले उत्तर!
अभिषेक बच्चन
Follow us on

मुंबई : ‘ज्युनिअर बच्चन’ अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. सतत होणाऱ्या ट्रोलला देखील तो उत्तर देत ​​असतो. अलीकडे अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना आभासी आलिंगन दिले होते. ज्यावर एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कदाचित आपण या आभासी आलिंगनांपेक्षा जास्त काही केले असते.’ यावर अभिनेत्याने चोख प्रतिक्रिया दिली आहे (Fan tries to troll actor Abhishek Bachchan gives reply).

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, अभिषेक बच्चन यांनी एक ट्विट करत लिहिले आहे की, ‘मी तुम्हा सर्वांना व्हर्च्युअल हग्स पाठवत आहे. खूप प्रेम पसरवा, आपल्याला यासारख्या काळात त्याची गरज आहे. #MaskOn’

यावर एक महिला वापरकर्त्यीने लिहिले की, ‘कदाचित तुम्ही आभासी आलिंगन पाठवण्यापेक्षा जास्त काही केले असते… लोक ऑक्सिजन आणि बेडशिवाय मरत आहेत. त्यासाठी हे आलिंगन पुरेसे नाहीत, सर.’ तिला उत्तर देताना अभिषेकने लिहिले की, ‘मी मॅम करतोय. मी सोशल मीडियावर पोस्ट करत नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी काहीही करत नाही. मी माझ्याने जितके शक्य असेल तितके देण्याचा प्रयत्न करतो आहे. परिस्थिती खूप वाईट आहे, म्हणून असे वाटले की अशा परिस्थितीत थोडेसे प्रेम आणि सकारात्मकता ही आपली मदत करू शकते.’

पाहा ट्विट वॉर

कोरोना काळात मदतीसाठी सज्ज बॉलिवूडकर

कोरोनाच्या या काळात अनेक सेलेब्रिटी मदतीसाठी बाहेर पुढे आले आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सलमान खानने फूड पॅकेटची व्यवस्था केली होती. त्याचवेळी अक्षय कुमारने गौतम गंभीर फाउंडेशनसाठी 1 कोटी रुपये दिले आहेत.

याआधीही अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शन प्रकरण गाजत असतानाच एका वापरकर्त्याने अभिषेकला ‘तुझ्याकडे हॅश आहे का?’, असा प्रश्न सोशल मीडियाद्वारे विचारला होता. यावर अभिषेकने त्याला सणसणीत उत्तर दिले होते. ‘मला माफ करा, माझ्याकडे असले काही नाही. मात्र, मी तुमची भेट मुंबई पोलिसांशी करून देऊ शकतो’, असे उत्तर त्याने या व्यक्तीला दिले होते.

वडिलांच्या सल्ल्याने वाचली अभिषेकची कारकीर्द

नुकतेच एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याने याविषयी भाष्य केले होते. यावेळी त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीत न राहण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा दिवस आठवला. अभिषेक बच्चन म्हणाला की, सार्वजनिक व्यासपीठावर अपयशी होणे फार कठीण गोष्ट आहे. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, परंतु मी माध्यमांद्वारे असे वाचत होतो की लोक मला शिवीगाळ करतात आणि असे म्हणतात की, मला अभिनय माहित नाही.’

तो म्हणाले की, एक काळ असा आला की, जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आलो तेव्हा ही माझी चूक आहे असे मला वाटू लागले. तथापि, मी प्रयत्न करत होतो. परंतु, हाती काहीही काम नव्हते. मी वडिलांकडे गेलो आणि म्हणालो की, कदाचित मी या उद्योगासाठी बनलेलोच नाही. अभिषेक पुढे म्हणाला की, त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला सांगितले की, तुम्ही हार मानावी अशा रीतीने मी तुला मोठे केले नाही. सूर्या प्रमाणे तळपण्यासाठी दररोज सकाळी आपल्याला उठून आपल्याला संघर्ष करावा लागतो. अभिनेता म्हणून तू प्रत्येक चित्रपटात चांगले काम करत आहेस.

(Fan tries to troll actor Abhishek Bachchan gives reply)

हेही वाचा :

Radhe : सलमान खानच्या ‘राधे’चं ‘सिटी मार’ गाणं आलं; सोशल मीडियावर धुमाकूळ

मी हॉस्पिटलला पोहोचण्याच्या 12 मिनिटांआधी आईने प्राण सोडला, अभिनेता अमन वर्माची खंत