रेखा आणि फारुख शेख यांच्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या शूटिंग सुरू होतं. दोघांचा रोमँटिक सीन सुरू असल्याचं गावकऱ्यांना कळलं आणि गावातील रेखाचे फॅन्स बंदूका घेऊन शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले. नेमकं काय घडलं होतं?
बॉलिवूड अभिनेत्रींचे असे अनेक फॅन असतात जे आपल्या आवडीच्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. एवढंच नाही पण काहीवेळी त्यांचं प्रेम हे एवढं टोकाला जातं की ते काहीही पाऊल उचलात असे किस्से फक्त आताच्या अभिनेत्रींसोबत नाही तर अगदी 70s ते 80s च्या अभिनेत्रींसोबतही घडलेले आहेत. खरंतर आतापेक्षाही तेव्हाच्या अभिनेत्रींनी चाहत्यांचे जास्तच भयानक अनुभव आले आहेत.
रेखा यांच्यासोबत अतिशय भयानक किस्सा घडला होता
याला बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा ही अपवाद नाहीये. त्यांच्यासोबत तर अतिशय भयानक किस्सा घडला होता. रेखा आता जेवढ्या सुंदर दिसतात त्याहीपेक्षा त्या तरुणपणी जास्त सुंदर दिसायच्या. रेखा यांची फॅनफॉलोइंगही तेवढीच होती. त्यांच्या अभिनयासोबतच चाहते त्यांच्या सौंदर्यावर भाळायचे. आजही रेखा आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘उमराव जान’.
‘उमराव जान’च्या चित्रपटाच्या सेटवर झाला होता राडा
या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना अजूनच त्यांच्या प्रेमात पाडलं. मात्र, एकेकाळी त्यांचे हे सौंदर्यच त्यांच्यासाठी मोठी समस्या बनले होते. या संदर्भात अभिनेता फारुख शेख यांनी एका मुलाखती एक धक्कादायक किस्सा सांगितला होता. ‘उमराव जान’ चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती, जी आजही लोक आवडीने ऐकतात. या चित्रपटात रेखासोबत नवाबची भूमिका अभिनेता फारुख शेख यांनी साकारली होती. त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक रोमांचक आणि भीतीदायक प्रसंग सांगितला.
फारुख शेख यांनी सांगितले की, “उमराव जानचे शूटिंग लखनौजवळील मलिहाबाद येथील एका जुन्या घरात सुरू होते. गावकऱ्यांना समजले की, रेखा आणि माझ्यात एक रोमँटिक सीन शूट होणार आहे. हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गाव तिथे जमा झाले होते.”
चाहत्यांनी थेट बंदुका काढल्या अन्
ते पुढे म्हणाले, “ज्या खोलीत हे शूटिंग सुरु होते, ती खूप लहान होती आणि कॅमेऱ्याची मांडणीसुद्धा अवघड होती. त्यामुळे गावकऱ्यांना ते दृश्य स्पष्ट दिसत नव्हते, यामुळे काही लोक अस्वस्थ होऊ लागले. प्रत्येकाला ते शूटिंग पाहायचे होते, परंतु जागेअभावी काहींना वाट पाहावी लागत होती. लोकांना एका वेळी फक्त 2 ते 5 मिनिटांसाठी आत जाऊन शूटिंग पाहण्याची संधी मिळत होती. मात्र, गर्दी वाढत गेली आणि लोक संतप्त झाले. काहींनी बंदुका बाहेर काढल्या आणि तणाव निर्माण झाला.”
या घटनेने संपूर्ण युनिट आणि कलाकार घाबरले होते. मात्र, कसाबसा जमाव नियंत्रणात आणण्यात आला आणि तणावपूर्ण वातावरणात हे शूटिंग पूर्ण करण्यात आलं.या घटनेने संपूर्ण युनिट आणि कलाकार घाबरले होते. रेखाला पाहण्यासाठी किंवा त्यांचा तो रोमॅंटिक सीन पाहण्यासाठी एवढा मोठा गोंधळ होईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.