’60 वर्षांचा हिरो, हिरोईन 28ची…’ सिकंदरमधील सलमान-रश्मिकाची जोडी रुचली नाही, चाहत्यांकडून ट्रोल

| Updated on: Mar 19, 2025 | 7:05 PM

'सिकंदर' चित्रपटातील सलमान खान त्याच्यापेक्षा 32 वर्षांनी लहान असलेल्या नायिका रश्मिका मंदानासोबत नायक म्हणून काम केल्याबद्दल टीका होत आहे. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या वयातील अंतर ही महत्त्वाची गोष्ट मानली जातच नाही का? असा सवाल आता सोशल मीडियावर सर्वांनीच उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

60 वर्षांचा हिरो, हिरोईन 28ची... सिकंदरमधील सलमान-रश्मिकाची जोडी रुचली नाही, चाहत्यांकडून ट्रोल
Fans react to Salman Khan and Rashmika Mandanna age gap controversy in the movie Sikandar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ईदच्या निमित्ताने सिकंदर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र चित्रपट रिलीजआधीच सलमानवर चाहत्यांनी निशाणा साधला आहे. ‘सिकंदर’ मधील गोष्ट नेमकी काय आहे याबद्दल अद्याप तरी उलगडा झालेला नाही. पण या चित्रपटातील सलमान आणि रश्मिराच्या जोडीवरून आता चाहत्यांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सलमान-रश्मिकाच्या जोडीवरून गोंधळ 

दोघांच्याही वयावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात सलमान खानच्या वयाबद्दल मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सलमान या वर्षी 27 डिसेंबर रोजी त्याच्या वयाची साठी गाठेल. आणि सिकंदरमध्ये, तो दोन अभिनेत्रींसोबत काम करतोय एक अठ्ठावीस वर्षांची रश्मिका मंदान्ना आणि एकोणचाळीस वर्षांची काजल अग्रवाल. चित्रपटातील सलमानच्या व्यक्तिरेखेचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण रिलीज झालेल्या सर्व गाण्यांमध्ये सलमान आणि रश्मिका यांच्यातील केमिस्ट्री दिसून येते. या केमिस्ट्रीमुळे आता सलमानच्या वयावरून चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या वयातील अंतर महत्त्वाचं नाहीये का?  

चाहत्यांचा आता असा प्रश्न असा आहे की 28 वर्षांची रश्मिका मंदाना 60 वर्षांच्या सलमान खानसोबत कशी दिसेल? दोन्ही कलाकारांच्या वयानुसार, रश्मिका मंदाना सलमान खानच्या वयाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आता चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या वयातील अंतरावर बोललं जातच नाही का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. याआधीही अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची जोडी पाहायला मिळाली आहे. ज्या जोडीत अभिनेत्याचे वय हे अभिनेत्रीच्या वयापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट होतं. आणि म्हणूनच आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चित्रपटांमध्ये आता अभिनेत्रीचे वय आणि अभिनेत्याच्या वयातील अंतराचा काहीच फरक पडत नाही का?

सलमान आणि रश्मिका यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना रुचली नाही 

दरम्यान चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज होत आहेत. सलमान रश्मिकाच्या जोडीला चाहते फारसी पसंती देताना दिसत नाहीये. तसेच या चित्रपटात काजल अग्रवालची भूमिका काय आहे, याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता आहे.पण सलमानच्या वयानुसार त्याने खरंच रश्मिकाच्या हिरोची भूमिका करणं कितपत योग्य आहे असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.