Farhan Akhtar Announced 120 Bahadur : हरहुन्नरी दिग्दर्शक फरहान अख्तर याने आगामी चित्रपट ‘120 बहादुर’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट समजू शकलेली नाही. ‘भाग मिल्खा भाग’या चित्रपटात धावपटू मिल्खा सिंग याची कथा पडद्यावर दाखविल्यानंतर आणखी एक सत्य घटनेवरील चित्रपटाची घोषणा फरहान याने केली आहे.रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटनरटेन्मेंटने ट्रीगर हॅप्पी स्टुडिओज सोबत एकत्रितपणे या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट भारत आणि चीन युद्धावरील एका लढाईवर बेतलेला आहे. काय आहे या चित्रपटाची कहाणी पाहूयात…
‘120 बहादुर’ या आपल्या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर फरहान अख्तर याने सोशल मिडीयावर अकाऊंटवर शेअर केले आहे. फरहान याच्या चित्रपटाची प्रेक्षक आवर्जून वाट पाहात असतात. या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मिडीयावर फरहान अख्तर याने शेअर केले आहे.या पोस्टरवर बंदूक पकडलेला एक जवान पाठमोरा उभा असलेला दिसत आहे. त्याचा चेहरामात्र या दिसत नाही.4 सप्टेंबर पासून ‘120 बहादुर’ चे पहिले शुटिंग शेड्यूल सुरु होत आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण लडाखमध्ये होत आहे.
फरहान अख्तर यांनी कारगिर युद्धावरचा ‘लक्ष्य’ हा ऋतिक रोशन आणि यांना घेऊन काही वर्षांपूर्वी चित्रपट काढला होता. परंतू हा चित्रपट तिकीटबारीवर तितकासा चमत्कार करु शकला नाही. त्यानंतर हा त्याचा आणखी एक युद्धपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंह ( पीव्हीसी ) आणि चार्ली कंपनी, 13 कुमाऊं रेझिमेंटचे सैनिकांची कहानी सर्वासमोर येणार आहे. मेजर शैतान सिंह यांची भूमिका स्वत:फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने साकारली आहे. 18 नोव्हेंबर 1962 रोजी भारत-चीन सीमेवर लढलेलं रेझांग ला युद्ध आपल्या बहाद्दर सैनिकांच्या अतुलनीय शौर्य,अभूतपूर्व धैर्य आणि निस्वार्थीपणाची कहाणी आहे असे फरहान खान यांनी म्हटले आहे.