Tunisha Sharma Suicide : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma ) आत्महत्येमुळे टीव्ही विश्वात मोठी खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे तुनिशाने बॉयफ्रेंड शीजान खानच्या ( (Sheezan Mohammed Khan) ) मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप आणि अभिनेत्री गरोदर असल्याचं देखील सांगितलं जात आहे. नात्यात आलेल्या वळणामुळे तुनिशा तणावाखाली होती आणि म्हणून अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं कारण समोर येत आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर पाच प्रश्न उपस्थित होत आहेत. जाणून घेवू कोणते आहेत, ते ‘पाच’ प्रश्न (tunisha sharma death)
पहिला प्रश्न : आत्महत्येच्या आधी तुनिशाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती हेयर स्टाईल करताना दिसत होती. त्यानंतर अचानक असं काय झालं की तुनिशाने आत्महत्या केली?
दुसरा प्रश्न : तुनिशाच्या आत्महत्येनंतर मालिकेच्या सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करत आहेत. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड शीजान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या का केली? याची चौकशी देखील पोलीस करत आहेत.
तिसरा प्रश्न : तुनिशा फक्त 20 वर्षांची होती. एवढ्या कमी वयात तुनिशा प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारुपास आली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुनिशाने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय का घेतला?
चौथा प्रश्न : तुनिशा नेहमी आनंदात असायची, इन्स्टाग्रामवर ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. असं असताना तिने आत्महत्या का केली? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाचवा प्रश्न : जेव्हा तुनिशाने आत्महत्या केली, तेव्हा सेटवर अनेक जण उपस्थित होते. त्यापैकी कोणीच अभिनेत्रीला आत्महत्या करताना पाहिलं नाही? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे.
शीजान खान आणि तुनिशा शर्मा ‘अलीबाबा दास्तान ए काबूल’ मालिकेत एकत्र काम करत होते. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर शीजानला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुनिशाने आत्महत्या का केली? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण
तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.