नाव बदललं अन् अब्दुल रहमान बॉलिवूडचा किंग खान झाला; या 10 अभिनेत्यांनी नावं बदलून सुपरस्टार झाले

| Updated on: Mar 22, 2025 | 4:18 PM

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपली नावे बदलून यश मिळवलं आहे. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, कॅटरीना कैफ, आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला आपली नावे बदलली आहेत. काही जणांनी नावे प्रसिद्धीसाठी तर काही जणांनी प्रेक्षकांशी अधिक कनेक्ट होण्यासाठी नावे बदलली आहेत.

नाव बदललं अन् अब्दुल रहमान बॉलिवूडचा किंग खान झाला; या 10 अभिनेत्यांनी नावं बदलून सुपरस्टार झाले
Bollywood Celebrity name changes
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बॉलिवूडमध्ये नाव बदलण्याचा एक ट्रेंड आहे. सिनेमात नशीब अजमवण्यासाठी आलेले असंख्य लोक बॉलिवूडच्या दुनियेला साजेसं नाव ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणावर मिळाली आहे. आधी आहे त्या नावाने सिनेमे केल्यानंतर प्रसिद्धी नाही मिळाल्याने अनेकांनी नावे बदलून अमाप यश मिळवल्याची उदाहरणेही आहेत. बॉलिवूडमधील असे 10 अभिनेते आहेत की ज्यांनी नावं बदलली आणि मोठं यश मिळवलं. या अभिनेत्यांनी नावे बदलली नसती तर त्यांना आज कोणत्या नावाने संबोधलं असतं हे तुम्हाला माहीत आहे का? या कलाकारांनी नावे बदलली नसती तर आज अब्दुल रहमान बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार ठरला असता. पण अब्दुल रहमानने नाव बदललं अन् तो सुपरस्टार झाला.

कोणत्या अभिनेत्यांनी नावे बदलली?

दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेकांनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच आपलं नामकरण करून घेतलं. अमिताभ बच्चन यांचं खरं नाव तर इंकलाब होतं. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनीच अमिताभ यांचं नाव इंकलाब हे नाव बदलून अमिताभ ठेवलं. बच्चन कुटुंबाचं आधीचं आडनाव श्रीवास्तव होतं. तेही बदलून बच्चन करण्यात आलं. म्हणजे नाव आणि आडनाव बदलले अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील एकमेव अभिनेते आहेत. इतरांची नावेच बदलली आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमारचं नाव राजीव हरिओम भाटिया होतं. इंडस्ट्रीत आल्यावर त्याने हे नाव बदललं.

सलमानचं खरं नाव काय?

सलमान खानचं सलमान खान हे शॉर्ट नाव आहे. त्याचं असली नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. कॅटरीना कैफनेही इंडस्ट्रीत आल्यावर तिचं आडनाव बदललं. प्रेक्षकांशी अधिक कनेक्ट होता यावं म्हणून तिने आडनाव बदललं. तिचं आडनाव टरकोटे होतं. कॅटरीना टरकोटे ही तिची जुनी ओळख आहे. अजय देवगनचं खरं नाव विशाल देवगन होतं. तर शाहरुख खानचं नाव त्याच्या आजीने अब्दुल रहमान ठेवलं होतं. पण नंतर त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव शाहरुख ठेवलं. जर शाहरुख खानच्या वडिलांनी त्याचं नाव बदललं नसतं तर आज अब्दुल रहमान या नावाने शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार राहिला असता.

यूसुफ खान बनले दिलीप कुमार

दिलीप कुमार यांनी इंडस्ट्रीत आल्यावर त्यांचं नाव बदललं. त्यांचं खरं नाव मोहम्मद यूसुफ खान होतं. तर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव शिवाजी राव गायकवाड होतं. कियारा आडवाणीचं खरं नाव आलिया आडवाणी होतं. पण बॉलिवूडमध्ये ती कियारा झाली. सनी लियोनीच्या नावाचंही असंच आहे. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. तिच्या भावाचं नाव सनी होतं. त्यामुळे तिने भावाच्या नावावरून प्रेरणा घेऊन तिचं नाव सनी लियोनी ठेवलं.