आधी टीबी, 10 ते 12 झोपून राहायची, लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या लेकीचे धक्कादायक खुलासे

| Updated on: Dec 02, 2024 | 7:58 PM

आमिर खानची मुलगी इरा खानने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत ती तिला झालेले आजार आणि तिच्यावर झालेले अत्याचार य़ाबाबत मोकळेपणाने बोलली आहे.

आधी टीबी, 10 ते 12 झोपून राहायची, लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या लेकीचे धक्कादायक खुलासे
Follow us on

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानची मुलगी इरा खान ही तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे किंवा तिच्या मेंटल हेल्थच्या समस्यांवर बोलण्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. इरा ही आमिर आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्यासोबत लहानपणी घडलेल्या काही धक्कादायक गोष्टींबद्दल खुलासे केले आहेत.

इराने तिला लहानपणी आलेल्या कटू अनुभवांबद्दल आणि त्यामुळे तिच्यावर त्याचा कसा परिणाम झाला होता याबद्दल सांगितलं.एवढच नाही तर त्या घटनांमुळे तिला डिप्रेशनही आले होते. तिची मेंटल हेल्थ बिघडली होती असेही तिने सांगितले. इराच्या आयुष्यात लहानपणी तशा बऱ्याच गोष्टी घडल्याचं तिने सांगितले पण सर्वात धक्कादायक घडलेल्या दोन गोष्टी म्हणजे लैंगिक शोषण आणि टीबी सारख्या गंभीर आजार.

आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे नैराश्य

एका मुलाखतीत, इराने सांगितलं की जवळपास साडे तीन वर्ष ती रोज रात्री रडायची आणि सतत झोपायची. तसेच तिने पुढे सांगितले की,” मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची असतानाच मला टीबी झाला होता.

आमिर खान आणि रीना दत्ताचा घटस्फोट झाला तेव्हा इरा खूपच लहान होती. दोघांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा इरावर मोठा परिणाम झाल्याचे तिने म्हटले आहे. नुकतंच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत इराने याबाबत खुलासा केला. ती नंतर अगदी लहान लहान गोष्टींसाठी रडू लागायची, तिला सतत वाईट आणि उदास वाटायचं. ती चार-चार दिवस जेवत नसे.

गंभीर आजार ते लैंगिक शोषण, इराला आलेले कटू अनुभव 

एवढच नाही तर 14 व्या वर्षी ती लैंगिक अत्याचाराची बळी ठरली असल्याचे धक्कादायक माहितीही तिने सांगितली. इराच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या आणि तिला हळूहळू जाणवू लागलं होतं की काहीतरी चुकीचं घडतंय. त्यानंतर तिने आपल्या पालकांकडे मदत मागितली आणि डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची मागणी केली. त्याचाही तिच्या जीवनावर प्रभाव पडल्याचे तिने म्हटले कारण बराच काळ तिच्यासोबत ते घडत होतं. पण तिला त्या गोष्टी कळत नव्हत्या.

इराने सांगितले की ती 10 ते 12 तास झोपून राहायची. तिला ती कधी उठूच नये असं वाटायचं. तिला जिवंत राहायचं नव्हतं. तिला कोणतंही काम करायचं नव्हतं, त्यामुळे दिवसाचा बहुतांश वेळ ती झोपून असायची. आयुष्यात अनेक गोष्टी घटना घडल्यानंतर ती स्वतःला ओझं समजू लागली होती. इराला आजही नैराश्याची भीती वाटते. कोणी दुसरा जरी नैराश्याचा शिकार झाला असेल तरीही तिला त्याबद्दल ऐकून भीती वाटते. तिच्या मते, हा एक भयानक आजार असून तिला आजही या आजाराची भीती वाटते.

दरम्यान आता तिने यासर्वांमधून स्वत:ला सावरलं असून पुढील आय़ुष्य सुंदर जगत आहे. तसेच तिने मेंटल हेल्थ आणि फिटनेससाठी एक वेलनेस सेंटरही सुरू केले आहे.