Gadar 2 |’पठाण’च्या पावलावर ‘गदर 2’चं पाऊल ! रक्षाबंधनानिमित्त सनी देओल घेऊन आला मोठी ऑफर

| Updated on: Aug 29, 2023 | 5:14 PM

गदर 2 बॉक्स ऑफिस वर कमाईच्या बाबतील धमाका करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन महिनाही पूर्ण झाला नाही तोपर्यंत या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. रक्षाबंधनानिमित्त जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यासाठी मेकर्स एक मोठी ऑफर घेऊन आले आहेत. अशाच पद्धतीची ऑफर शाहरूख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या वेळेसही देण्यात आली होती.

Gadar 2 |पठाणच्या पावलावर गदर 2चं पाऊल ! रक्षाबंधनानिमित्त सनी देओल घेऊन आला मोठी ऑफर
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : तारा आणि सकीना बनलेल्या सनी देओल ( Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांनी ‘गदर 2’ (Gadar 2) द्वारे मोठ्या पडद्यावर धमाका करत मोठा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बंपर कमाई सुरू केली आणि अवघ्या 18 दिवसांतच या चित्रपटाने 460.65 कोटींचा गल्ला जमवला आहे. असं असलं तरी तिसऱ्या सोमवारी चित्रपटाची घोडदौड थोडी स्लो झाली असली तरी ती वाढवण्यासाठी चित्रपटाच्या मेकर्सनी चांगली शक्कल लढवली आहे. गदर 2 ला 500 कोटींच्या क्लब मध्ये शामील होण्यासाठी आणखी 40 कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे. पण कमाईचा स्पीड स्लो झाल्याने हा आकडा पार करणं थोडं कठीण जाऊ शकतं.

याच पार्श्वभूमीवर चित्रपटाची घोडदौड वाढवण्यासाठी मेकर्स मोठी ऑफर घेऊन आले आहेत. रक्षाबंधनाचा सण अगदीच जवळ येऊ ठेपला आहे, त्याच निमित्ताने सनी देओलच्या या चित्रपटासाठी ‘Buy 2 Get 2’ ही ऑपर जारी करण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने या चित्रपटाती दोन तिकीटे खरेदी केली तर त्यांना दोन तिकीटे फ्री मिळणार आहेत.

ऑफरचे पोस्टर

या ऑफरसाठी एक पोस्टरही जारी करण्यात आले आहे. ‘ हे रक्षाबंधन आपल्या संपूर्ण परिवारासोबत साजरं करा’ असं त्यावर लिहीण्यात आलं आहे. असं असलं तरी एखाद्या चित्रपटासाठी अशी ऑफर जारी करण्याची ही काही पहिलीच वेळ तर नाही. याच वर्षी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासाठीदेखील मेकर्सनी अशीच ऑफर आणली होती. या ऑफरमुळे चित्रपटाला फायदा मिळून कमाईतही वढ झाली होती. इंडियन बॉक्स ऑफीसवर ‘पठाण’या चित्रपटाने 543 कोटी रुपये कमावले होते. तर जगभरात चित्रपटाच्या कमाईचा आकडा 1000 कोटींच्या पार गेला होता.

 

दरम्यान ‘गदर’ या चित्रपटाप्रमाणेत ‘गदर 2 ‘ चे दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनी केले होते. सनी देओल, अमीषा पटेल यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात उत्कर्ष शर्मा आणि सिम्रत कौर यांचीही जोडी दिसली होती. पहिल्या चित्रपटात दिवंगत अभिनेते अमरीश पुरी हे खलनायकाच्या भूमिकेत होते. तर ‘गदर 2 ‘मध्ये मनीष वाधवा हे नकारात्मक भूमिकेत दिसले. यापूर्वी ते पठाण मध्येही दिसले होते.