Gashmeer Mahajani : ‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’, अभिनेता गश्मीर महाजनीचं ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर

| Updated on: Apr 11, 2021 | 7:32 PM

मराठी चित्रपटसृष्टीचा हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. (Gashmeer Mahajani's answer to the trollers )

Gashmeer Mahajani : ‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’, अभिनेता गश्मीर महाजनीचं ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. एवढंच नाही तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. आता नेहमी प्रमाणे त्यानं आपल्या गोंडस मुलासोबत फोटो शेअर केला आणि याच फोटोमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.

काय आहे प्रकरण…
नुकतंच गश्मीर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याचा मुलगा देखील आहे. या फोटोत गश्मीर त्याच्या मुलासोबत धमाल करत त्याची शेंडी ओढताना दिसतोय. यात गश्मीर आणि त्याचा मुलगा व्योम दोघांनीही पांढरं धोतरं गळ्यात रुद्राक्षाच्या माळा परिधान केल्या आहेत. नेमकं या फोटोमध्ये व्योमचं टक्कल केलेलं असून त्याची एक शेंडी दिसत आहे. गश्मीर या फोटोमध्ये हीच शेंडी ओढताना दिसतोय. यावरुन कमेंट सेक्शनमध्ये गश्मीरला खरी खोटी सुनावली आहे. काहींनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला आणि मुलाची शेंडी ओढून या विधिचा अपमान केलाय अशा आशयाच्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी गश्मीर चांगलंच ट्रोल केलंय.

गश्मीरचं ट्रोलर्सला उत्तर…
या सगळ्या प्रकारानंतर आता गश्मीरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. “मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. त्याची मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.” अशा शब्दात त्यानं आता नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

गश्मिर महाजनी साकारणार मुख्य भूमिका

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

Photo : ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर स्पृहाची अप्रतिम झलक, सुंदर फोटो शेअर

Photo : ऐश्वर्या रायची सेम टू सेम इरानी कॉपी पाहिलीय?, फोटो पाहाल तर म्हणाल, ‘ऐसा तो हमने देखा नही था पहले’